Girl Dance Viral Video: तुम्ही सोशल मीडियाच्या ‘दुनिया’मध्ये सक्रिय असाल तर तुम्हाला रोज एक मजेदार गोष्ट पाहायला मिळते. कधी-कधी तुमच्यासमोर असे प्रसंग येतात, ज्यावर विश्वास ठेवणे कठीण जाते. त्याचबरोबर काही व्हिडीओ पाहून लोकांचे दिवस बनतात. तर काही व्हिडीओ पाहून हसू येते. आज आम्ही तुम्हला एस असा व्हिडीआ दाखवत आहोत, जो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. कारण या व्हिडीओमध्ये चालत्या मेट्रोत एक मुलगी अचानक नाचू लागते. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. काही लोक मुलीची स्तुती करत आहेत तर काही लोक त्याचा आनंदही घेत आहेत.

या व्हायरल व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की, मेट्रोच्या सीटवर मोठ्या संख्येने प्रवासी बसलेले आहेत. तिथे काही लोक उभे आहेत. एक मुलगीही मास्क घालून आणि जीन्स जॅकेट घालून उभी असलेली दिसत आहे. पण, अचानक मुलगी नाचू लागते. व्हिडीओमध्ये वेलकम चित्रपटातील ‘एक उंचा कद’ हे गाणे बॅकग्राऊंडमध्ये वाजत आहे, ज्यावर मुलगी सुंदर स्टाईलमध्ये नाचत आहे. मुलीच्या हालचाली पाहून तिथे बसलेले इतर प्रवासी थक्क झाले. आणखी विशेष म्हणजे लोक त्याच्या डान्सकडे टक लावून पाहत आहेत.

आणखी वाचा : विमानात प्रवासी लक्ष देत नव्हते म्हणून या फ्लाईट अटेंडंट्सने असं काही केलं की…; पाहा VIRAL VIDEO

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : याला म्हणतात खरं प्रेम! आजी-आजोबांचा VIRAL VIDEO तरुणाईत एकदम हीट!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुलीची ही स्टाईल तुम्हालाही आवडली असेल. सोशल मीडिया यूजर्सना हा व्हिडीओ खूप आवडू लागला आहे. हा व्हिडीओ ‘kajal__d91’ नावाच्या इंन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. तर एक लाख ४१ हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडीओला लाईक केले आहे. तसंच अनेक लोक या मुलीचे जोरदार कौतुक करत आहेत.