shocking viral video: आयुष्याचं काहीही सांगता येत नाही, कोणता क्षण शेवटचा ठरेल हे कोणालाच ठाऊक नसतं. एका आनंदी क्षणात घेतलेला हशा कधी दु:खात बदलेल हे कुणालाच माहीत नसतं. अशाच एका हसऱ्या क्षणात घडलेली ही दुर्दैवी घटना सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. मित्र-मैत्रिणींसोबत आकाश पाळण्यात झुलत असताना एका तरुणीचा मृत्यू झाल्याचा व्हिडीओ सध्या ट्विटरवर वेगाने व्हायरल होत आहे. “आयुष्याचं काही खरं नाही, कधी साथ सोडून जाईल” या कॅप्शनसह हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
हा व्हिडीओ एका मनोरंजन उद्यानातील झुल्यावर घेतलेला असल्याचे सांगितले जात आहे. काही तरुण-तरुणी एकत्र बसून आकाश पाळण्याची मजा घेत होते. सुरुवातीला सगळे आनंदाने हसत होते, गप्पा मारत होते. अचानक पाळणा सुरू असतानाच एक मुलगी पुढे वाकून शांत झाली, तिच्या बाजूला बसलेला मुलगा तिला उठवण्याचा प्रयत्न करत होता. पहिल्यांदा त्याला वाटलं ती मस्करी करत आहे, पण काही क्षणांनी त्याने तिच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडले तरीही ती डोळे उघडत नव्हती.
त्या मुलीच्या चेहऱ्यावर काहीच हावभाव न दिसल्याने पाळण्यावर बसलेल्या सर्व जणांमध्ये चलबिचल होते. तो मुलगा घाबरतो आणि झुल्यावरून खाली उतरून तिला उचलायचा प्रयत्न करतो. त्यावेळी इतर मित्रही झुला थांबवतात आणि तिला खाली आणतात. त्यांनी तिला जागं करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. पाणी शिंपडलं, हाक मारली पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. त्या क्षणीच तिचा जीव गेला होता. काही क्षणांपूर्वी हसत असलेले चेहरे एका क्षणात दुःख आणि धक्क्यात बदलले. आसपासचे लोक हे पाहून घाबरले, सगळ्यांच्या चेहऱ्यावर निराशा आणि भीती दिसत होती.
पाहा व्हिडिओ
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं, तर काहींनी मनोरंजन झुलेच धोकादायक असल्याचं सांगितलं. एका युजरने लिहिलं, “कमकुवत मनाच्या लोकांनी अशा पाळण्यात बसू नयेत, हे पाळणे बंद करायला हवेत.” दुसऱ्याने म्हटलं, “आजच्या काळात आयुष्याचा काहीच भरोसा नाही, कोण कधी साथ सोडेल हे सांगता येत नाही.” तिसऱ्याने लिहिलं, “जगण्यातल्या मजेमागे लोक धावतात, पण कधी कधी तोच आनंद मृत्यूचे कारण ठरतो.” काहींनी अशा पाळण्यावर सुरक्षेची काळजी घेण्याची मागणी केली आहे.
एका क्षणात सुखाचं रूप दु:खात बदलतं आणि कोण कधी दूर निघून जाईल हे कोणीच सांगू शकत नाही. या घटनेनं सोशल मीडियावर पुन्हा एकदा सर्वांना विचार करायला भाग पाडलं आहे की, आनंद घेतानाही खबरदारी घेणं किती आवश्यक आहे.
