सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यात प्राण्यांचेही काही व्हिडीओ असतात. त्यांचे गोंडस हावभाव, प्रतिक्रिया अशा आपल्याला अचंबित करणाऱ्या गोष्टी या व्हिडीओमध्ये असतात. असाच एक हत्तीच्या पिल्लाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक हत्तीचे पिल्लू चिखलात अडकल्याचे दिसत आहे.

व्हायरल होणारा हा व्हिडीओ आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये चिखलात हत्तीचे पिल्लू अडकलेले दिसत आहे. तिथे उपस्थित असणारी एक मुलगी त्या पिल्लाला बाहेर निघण्यासाठी मदत करते आणि ते पिल्लू चिखलातून बाहेर येते. यानंतर हे हत्तीचे पिल्लू मुलीच्या डोक्यावर आशिर्वाद दिल्याप्रमाणे सोंडेने स्पर्श करून तिला धन्यवाद देते. ही प्रतिक्रिया पाहून तुम्हीही अचंबित व्हाल, पाहा व्हायरल होणारा हा व्हिडीओ.

आणखी वाचा : रेल्वे प्लॅटफॉर्मवरील बिघडलेल्या नळामुळे झाले प्रवाशांचे हाल; Viral Video पाहून तुम्हालाही आवरणार नाही हसू

व्हायरल व्हिडीओ :

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया :

Video : “मला वेडी बोलली?”, ओवाळणीच्या गाण्यावरून चिमुकलीचा निरागस प्रश्न होतोय Viral

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हत्तीच्या पिल्लाच्या या प्रतिक्रियेने नेटकऱ्यांचे मन जिंकले असून. ‘माणसांप्रमाणे प्राण्यांमध्ये देखील कृतज्ञतेची भावना असते, त्यांना देखील मदतीची जाणीव असते’ अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.