प्रवास करतेवेळी अनेकजण विचित्र स्टंट करताना पाहायला मिळतात. फोटो किंवा एखादा व्हिडिओ काढायच्या नादात अनेकजणांसोबत मोठा अपघात घडतो. त्यामुळे प्रवास करतेवेळी सावधगिरी बाळगली पाहिजे असं वारंवार सांगितलं जातं. तरीही काहीजण चालू ट्रेनमधून किंवा गाडीतून विचित्र प्रकार करताना दिसून येतात. असाच काहीसा प्रकार समोर आला आहे जो पाहून तुमच्याही अंगावर शहारे येतील.

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक तरुणी ट्रेनमध्ये बसली आहे. तितक्यात ती ट्रेनच्या बाहेर तोंड काढून व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करते. मात्र तेवढ्यातच एक दुसरी ट्रेन शेजारून भरघाव वेगाने येत असते. तरुणीला हे समजताच ती अगदी काही सेकंदाच्या आत खिडकीतून आत येते आणि मोठा अपघात टळतो. यावेळी थोडासाही उशीर झाला असता तर या तरुणीसोबत मोठा अपघात घडला असता.

येथे पाहा व्हिडिओ

( हे ही वाचा: मुलीने वडिलांचा गुपचूप Video बनवला; त्यानंतर जे दिसलं ते पाहून भारावून जाल)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

@OTerrifying या अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर कमालीचा व्हायरल होत आहे. याशिवाय या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रयादेखील येताना दिसत आहेत. या व्हिडीओला आतापर्यंत एक लाखाहून जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.