scorecardresearch

प्रेमासाठी वाट्टेल ते! लग्नाला नकार दिला म्हणून प्रियसीचे प्रियकराच्या घरासमोर आंदोलन, तीन दिवसांनी मिळाला न्याय

तरुणीने सांगितले की, लग्नाला नकार देत असलेला मुलगा आणि ती मागील ४ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत

प्रेमासाठी वाट्टेल ते! लग्नाला नकार दिला म्हणून प्रियसीचे प्रियकराच्या घरासमोर आंदोलन, तीन दिवसांनी मिळाला न्याय
एक मुलगी प्रियकराच्या घरासमोर आंदोलनाला बसल्याची घटना समोर आली आहे. (Photo : Indian Express, loksatta)

सोशल मीडियावर अनेक प्रेम प्रकरणाच्या बातम्या आपण वाचत असतो. ज्यामध्ये एखादा मुलगा आपल्या प्रेयसीसाठी जीव द्यायला तयार होतो. तर, कधी मुलगी प्रियकरासाठी घरच्यांना सोडून पळून जाते, अशा आपण अनेक घटना पाहिल्या आहेत. मात्र सध्या एका मुलाने त्याचा प्रेयसीला लग्न करण्यास नकार दिला म्हणून या प्रेयसी मुलाच्या घरासमोर चक्क आंदोलनाला बसल्याची घटना समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार हे प्रकरण झारखंडमधील धनबाद जिल्ह्यातील असून प्रियकराने लग्न करण्यास नकार दिला म्हणून मुलीने प्रियकराच्या घराबाहेर तीन दिवस बसली होती. तरुणीने सांगितले की, ‘सध्या लग्नाला नकार देत असलेला मुलगा आणि ती मागील ४ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. या मुलीला प्रियकराने लग्न करण्यास नकार दिला तरीही तिने हार मानली नाही आणि कडाक्याच्या थंडीत प्रियकराच्या घराबाहेर ठिय्या मारला. जवळपास ३ दिवस ती प्रियकराच्या घरासमोर बसली होती. अखेर तिच्या या प्रयत्नांना यश आलं आणि रविवारी दोन्हीकडील घरच्यांच्या संमतीने त्यांचे लग्न लावून देण्यात आले.

हेही पाहा- Video: उड्डाणपुलावर उभा राहून ‘तो’ उधळत होता पैसे; त्यानंतर जमलेल्या लोकांनी काय केलं ते एकदा पाहाच

उत्तम महतो आणि निशा कुमारी असं या घटनेतील प्रेम युगुलाचं नाव आहे. त्यांचा विवाह राजगंज येथील एका मंदिरात पार पडला. महेशपूर गावात राहणारा उत्तम महतो आणि तिचे गेल्या चार वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याचे तरुणीने सांगितले. शिवाय ती धनबाद येथे कॉलेजमध्ये शिकत असताना तिची आणि उत्तमची भेट झाली होती असंही तिने सांगितलं.

हेही पाहा- शाळेत घेऊन जाणाऱ्या आईवर रुसला आणि चक्क स्कुटीवर मांडी घालून बसला, Video पाहून पोट धरून हसाल

निशाने म्हणाली, ‘आमच्या नात्याची दोघांच्या घरच्यांन माहिती होती, उत्तमने तिला लग्न करण्याचे वचन दिले होते. दोघेही एकमेकांच्या कुटुंबाला अनेकदा एकत्र भेटले होते. दोघांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या लग्नाची तारीखही ठरलेली होती पण तारखेच्या २० दिवस आधी उत्तमने लग्नाला नकार दिला.’ यानंतर निशा हट्टाला पेटली आणि अखेर तिने उत्तमलाही तिच्याशी लग्न करण्यास भाग पाडलं. सध्या या घटनेची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-01-2023 at 20:17 IST

संबंधित बातम्या