Girls Seen Playing Cricket On Mountain : देशातील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. बरेचदा ते मनोरंजक, मजेदार व्हिडीओ आणि स्टोरी शेअर करीत असतात. त्या माध्यमातून ते लोकांना आपल्याशी जोडून ठेवतात. त्यांचे काही व्हिडीओ खरोखर खूप प्रेरणादायी असतात; ज्यांचा लोकही आनंद घेतात. त्यांनी पुन्हा एकदा असाच एक प्रेरणादायी व्हिडीओ शेअर केला आहे; जो पाहताना तुम्हीही आश्चर्य व्यक्त कराल.
तुम्ही अनेक लोकांना क्रिकेट खेळताना पाहिले असेल; ज्यावरून लोकांची खेळाबद्दलची आवड ओळखता येते. आता आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या सोशल मीडिया हॅण्डलवरून असाच एक व्हिडीओ शेअर केला आहे; ज्यामध्ये मुली एका वेगळ्याच लेव्हलचे क्रिकेट खेळताना दिसत आहेत. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये आनंद महिंद्रा यांनी लिहिले की, भारत क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जात आहे किंवा मी अनेक ‘स्तरा’पर्यंत घेऊन जात आहे, असे म्हणावे.
ट्रकची हेडलाइट तुटल्याने खर्च वाचवण्यासाठी केला गजब जुगाड; मिठाईच्या बॉक्सचा असाही वापर, पाहा VIDEO
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, मुलींची एक टीम डोंगराळ भागात क्रिकेट खेळताना दिसत आहे. यावेळी त्यांची क्रिकेट मॅच पाहण्यासाठी अनेक लोक तिथे बसलेले दिसतायत. बॅटिंग करणाऱ्या मुली अगदी धोनी स्टाईलने स्वॅगमध्ये बॅटिंग करीत चौकार व षटकार मारताना दिसत आहेत.
पुढे व्हिडीओमध्ये तुम्ही पहाल की, एक मुलगी फिल्डिंगसाठी टेकडीवर उभी आहे; जी हवेत फटकावलेला चेंडू पकडण्यासाठी वेगाने धावते. या क्रिकेटचे वैशिष्ट्य म्हणजे डोंगराळ भागात जिथे चढणे-उतरणे अतिशय कष्टाचे आणि तितकेच धोकादायक असते, त्या जागी या मुली उत्तम प्रकारे फिल्डिंग करीत आनंदाने क्रिकेट खेळत आहेत.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत होत आहे. लोक या व्हिडीओचे खूप कौतुक करीत आहेत. एका युजरने लिहिले- क्रिकेट आमच्या रक्तात आहे सर. दुसर्याने लिहिले- हे थ्रीडी क्रिकेट आहे. तिसर्याने लिहिले- भारत हा सृजनशीलतेचा देश आहे आणि जेव्हा क्रिकेटचा विषय येतो…तेव्हा इथे क्रिकेटविषयीचे वेड आणि प्रेम वेगळ्याच पातळीवरील असते. चौथ्याने लिहिले- सर, खेळण्यासाठी मन लागते, जागा काय कुठेही मिळते; नाही तर मोबाईलच्या जमान्यात मैदान सुनसान पडले आहे!!