Teacher Sleeping In School Video Viral :  सोशल मीडियावर एक अतिशय लज्जास्पद व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एका शाळेतील आहे, जिथे एक महिला शिक्षिका भरवर्गात डाराडूर झोपलेली दिसत आहे. वर्गात काही विद्यार्थी बसलेले दिसत आहेत. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर लोक महिला शिक्षिकेबद्दल राग व्यक्त करत आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ बिलासपूर जिल्ह्यातील मस्तुरी ब्लॉकच्या बरेली येथील प्राथमिक शाळेतील असल्याचं सांगितलं जात आहे. हा व्हिडीओ पाहून शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. व्हिडीओत मुलांना शिकवण्याऐवजी शिक्षिका वर्गात खुर्चीवर आरामात बसून झोपली आहे आणि विद्यार्थी स्वत:च अभ्यास करत आहेत, असे दिसून येत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शिक्षण विभाग याप्रकरणी काय कारवाई करणार असा प्रश्न लोक करत आहेत. तर काहींनी देशाचं भवितव्य कोणत्या दिशेनं जातंय म्हणत चिंता व्यक्त केली आहे.

खेड्यापाड्यातील विद्यार्थी दूरचा प्रवास करून शाळेत पोहोचतात. हे विद्यार्थी भविष्यासाठी अनेक स्वप्न उराशी बाळगत शाळा गाठतात, पण प्रत्यक्षात त्यांना शाळेत अशा भीषण परिस्थितीचा सामना करावा लागतो, याचे भयावह चित्र या व्हिडीओतून समोर आले आहे.

हेही वाचा – भावांच्या स्पीडला तोड नाही! भंडाऱ्यात अवघ्या सेकंदात शेकडोंना वाढल्या प्लेट, डिश अन् जेवण, VIDEO पाहून युजर्स शॉक

व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, एका शाळेत विद्यार्थ्यांसमोर एक महिला शिक्षिका आरामात झोपली आहे, यावेळी एक व्यक्ती मोबाइल कॅमेरा सुरू करून वर्गात येते आणि विचारते की, शिकवणी सुरू आहे का? तुम्ही झोपला आहात? यावर शिक्षिकेने उत्तर दिले की, सकाळी आल्यापासून डोकेदुखीचा त्रास होत आहे, बरं वाटत नाहीये. यानंतर शिक्षिका थातुरमातुर उत्तरं देते; पण त्यानंतर ती व्यक्ती जेव्हा विद्यार्थ्यांना प्रश्न विचारते, तेव्हा ते हसायला लागतात.

ही घटना शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी अधोरेखित करते, जिथे मुलांना वेळेवर शिक्षण देण्याऐवजी शिक्षकच विश्रांती घेत आहेत. याबाबत शिक्षण विभागाने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र, आता भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी या गंभीर निष्काळजीपणावर शिक्षण विभाग काही कारवाई करतो का, हे पाहावे लागेल.

शिक्षण विभाग याप्रकरणी काही कारवाई करणार का? युजर्सचा सवाल

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शिक्षण विभाग याप्रकरणी काही कारवाई करणार का, असा सवाल लोक करत आहेत. व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, मुलांसमोर बसलेले शिक्षक झोपलेले आहेत, तर मुलांना अभ्यासाची गरज आहे. एक व्यक्ती आपल्या मोबाइलचा कॅमेरा चालू करते आणि मग वर्गात प्रवेश करते. प्रवेश करताना तो म्हणू लागतो की अभ्यास चालू आहे, तू झोपत आहेस का? यावर शिक्षिकेने उत्तर दिले की ती सकाळी आल्यापासून तिला डोकेदुखीचा त्रास होत आहे. बरे वाटत नाही, पण तिचे लक्ष मोबाइलकडे जाताच ती प्रश्न विचारते की, व्हिडीओ काढतोयस का? यावर तरुण हो असे उत्तर देत पुढे विद्यार्थ्यांना प्रश्न विचारतो की, बाई शिकवतात का? यावर विद्यार्थी काहीच न बोलता हसत राहतात. या सर्व प्रकाराने शिक्षिका चांगलीच घाबरते आणि त्याला कॅमेरा बंद करण्यास सांगते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ही घटना शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी अधोरेखित करते, जिथे मुलांना वेळेवर शिक्षण देण्याऐवजी शिक्षकच विश्रांती घेत आहेत. याबाबत शिक्षण विभागाने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.