सोशल मीडियावर सध्या एका सरकारी शाळेतील मुलींचा डान्स व्हिडीओ खूप व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आलं आहे आणि लोक या मुलींच्या टॅलेंटचं कौतुक करीत आहेत. छोट्या गावातल्या किंवा साध्या शाळांमध्येही किती चांगलं टॅलेंट लपलेलं असतं, हे या व्हिडीओतून दिसतं.

हा व्हिडीओ सगळ्यांना एक छान संदेश देतो आणि तो एका सरकारी शाळेच्या वर्गातील आहे. काही विद्यार्थिनी शाळेच्या गणवेशात ब्लॅकबोर्डसमोर उभे राहून भोजपुरी स्टार दिनेश लाल यादव ‘निरहुआ’ यांच्या ‘मरून कलर सादिया’ या लोकप्रिय गाण्यावर नाचताना दिसत आहेत. कोणताही मोठा स्टेज नाही, साउंड सिस्टीम नाही – तरी त्यांच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास व उत्साह प्रत्येकाचं लक्ष वेधून घेतो. बाकीचे विद्यार्थी हातात टाळ्या वाजवत या परफॉर्मन्सचा आनंद घेत आहेत. शाळेचं वातावरण काही क्षणांसाठी एका छोट्या स्टेजमध्ये रूपांतरित झाल्यासारखं वाटतं.

या मुलींच्या डान्समध्ये फक्त स्टेप्स नव्हत्या, तर त्यांचा जिवंतपणा, समन्वय आणि स्वतःवरचा विश्वास स्पष्ट दिसत होता. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि सहजता पाहून कोणीही मंत्रमुग्ध झाल्याशिवाय राहू शकत नाही. काही सेकंदांच्या या व्हिडीओनं सिद्ध करून दाखवलं की, आत्मविश्वास आणि मेहनत असली की, मोठ्या मंचाची गरज नसते.

पाहा व्हिडिओ

इन्स्टाग्रामवर पोस्ट झालेल्या या व्हिडीओनं काही तासांतच लाखो व्ह्युज मिळवले आणि तो अनेक प्लॅटफॉर्मवर शेअर होत राहिला. युजर्सनी कमेंट्समध्ये या विद्यार्थिनींच्या टॅलेंटचं कौतुक केलं आहे. काहींनी लिहिलं, “खरं टॅलेंट पैशांवर नाही, तर मनापासून केलेल्या प्रयत्नांवर अवलंबून असतं.” तर काहींनी म्हटलं, “भारतातील छोट्या गावांमध्ये असलेली टॅलेंटेड मुलं कोणत्याही प्रोफेशनल कलाकारांपेक्षा कमी नाहीत.”

काही युजर्सनी व्हिडीओला ‘प्रेरणादायक’ म्हटले आणि असेही म्हटले की, सरकारी शाळांमध्येही प्रचंड प्रतिभा लपलेली आहे; फक्त तिला योग्य संधी आणि प्रोत्साहन देण्याची गरज आहे. या मुलींच्या या छोट्याशा कामगिरीमुळे सोशल मीडियावर सकारात्मकतेची लाट निर्माण झाली आहे. त्यांचे हास्य आणि आत्मविश्वास हे सिद्ध करतो की, खरी प्रतिभा कधीही पैशानं मोजली जात नाही – ती कुठेही असली तरी चमकते.