Viral video: भात लावणीदरम्यान जुनी लोकं शेतात कामं करता करता गाणी गायची, ओव्या बोलायची. यामध्ये त्यांची हसत खेळत कामं व्हायची. कामाचं ओझ वाटतं नव्हतं. अजूनही गावाकडं अशा पद्धतीनं शेतात कामं करता करता गाणी गायची पद्धत आहे. अशाच एका आजीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र यावेळी या आजीनं आजच्या काळातलं ट्रेंडिग गाणं गायलं आहे. हे गाणं एकून तुम्हालाही हसू आवरणार नाही. एका या आजीनं नेमकं कोणचं गाणं गायलं.

सोशल मीडिया म्हणजे व्हिडीओंचा खजाना आहे. इथे कधी काय व्हायरल होईल याचा काहीही नेम नाही. अशाच एका आजीचा शेतातला व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. “पोरी येरा केलास मला पागल केलास…” चक्क हे गाणं आजीनं गायलं आहे.

एका तरुणानं हा व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, आजी शेतात भात लावणी करत आहे. सोबतच इतर बायकाही भात लावणी करत असल्याचं व्हिडीमध्ये दिसत आहे. यावेळी आज्जीने भन्नाट असं गाणं गायलं आहे. आजीनं गायलेल्या गाण्याचा इतर महिलाही आनंद घेत आहेत. आजी अगदी तालासुरात गाणं बोलत आहे.नेटकऱ्यांनी आजीच्या टॅलेंटला चांगलीच दाद दिली आहे. सर्वत्र आजीचं कौतुक होत आहे. पूर्वीच्या बायतका ओव्या गायच्या मात्र या आजीनं थेट काळासोबत संस्कृती जपण्याचा प्रयत्न केला आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> तुम्हाला माहितीये का विमानात कुठलं इंधन वापरलं जातं, ते किती रुपये लीटरने मिळतं? जाणून घ्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियात सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. हा व्हिडीओ @royal_kokani_04 अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे. लोक वेगवेगळ्या प्रतिक्रियाही यावर नेटकरी देत आहेत.