आषाढी एकादशी २०२३: आज आषाढी एकादशी निमित्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण आहे. विठूनामाचा गजर करत असंख्य भक्त पायी वारी करून पंढरपूरला जातात आणि विठ्ठलाचे दर्शन घेतात. ही वर्षानुवर्षे चालणारी महाराष्ट्रातील परंपरा आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडीयावर वारकऱ्यांचे सुंदर फोटो आणि वारीतील सुंदर क्षणाचे फोटो समोर येत आहेत. दरम्यान सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे जो आगळ्या-वेगळ्या पद्धतीने वारीचे दर्शन घडवत आहे. विशेष म्हणजे एका नातीने आपल्या आजोबांना हा व्हिडिओ समर्पित केला आहे.

सोशल मिडीयावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये वारीतील विविध क्षणांचे डिजीटल चित्र दिसत आहे. विशेष म्हणजे या चित्रे एकमेकांमध्ये गुंफलेली आहेत. एक चित्र झूम करून पाहिल्यानंतर तुम्हाला पुढचे चित्र दिसत आहे. असे एकापाठो पाठ एक अनेक चित्रे तुम्ही पाहू शकता. या पैकी प्रत्येक फोटो सुंदर पद्धतीने रेखाटला आहे.

हेही वाचा – ५ तास रिक्षा चालवून मिळाले फक्त ४० रुपये, रिक्षाचालकाला कोसळले रडू, Viral Videoमध्ये सांगितली व्यथा

काय आहे या व्हिडिओमध्ये?

या व्हिडिओमध्ये सुरुवातीला एका वारकऱ्याचे चित्र दिसते. त्यानंतर एका मंदिराची सावलीचे चित्र दिसते. त्यानंतर घाटातून जाणारी वारीचे दृश्य चित्रात दिसते. त्यानंतर वारीमधील वारकऱ्यांचे फुगडी खेळतानाचे दृश्य चित्रात दिसते त्यानंतर वारीमध्ये रिंगणात धावणाऱा घोड्याचे चित्र दिसते आहे. त्यानंतर वारनिमित्त मंदिराबाहेर लागणाऱ्या पुजा साहित्याच्या विक्रीचा स्टॉल दिसतो. त्यानंतर पुढील चित्रात चंद्रभागेमध्ये स्थान करणाऱ्या वारकऱ्यांचे चित्र दिसते त्यानंतर एक पंढरपुरमधील मंदिराचे चिंत्र दिसते आणि सर्वात शेवटी पांढुरंगाचे चित्र दिसते आहे.

हेही वाचा – Louis Vuittonने तयार केली मीठाच्या दाण्यापेक्षा छोटी बॅग! लोक म्हणाले, ‘कशाला बनवली भाऊ?’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नातीने आजोबांसाठी केला खास व्हिडीओ

हा व्हिडिओ pranj_jelly नावाच्या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये, ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय ‘ लिहले आहे. आतापर्यंत या व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला आहे. लोकांनी प्रांजलीच्या कलेचे कौतूक केले आहे. हा मोहक व्हिडिओ पाहून तुम्हाला कसा वाटला.