Satsada Waterfall Rescue : पावसाळ्यात निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी अनेक पर्यटक उत्सुक असतात. आपल्या आसपास एकापेक्षा एक सुंदर धबधबे आहेत जिथे पावसाळ्यात आवर्जून पाहण्यासारखे असतात. डोंगरमाथ्यावर सतत होणारा पावसामुळे अनेकदा पाण्याची अचानक पातळी वाढू शकते त्यामुळे अशा ठिकाणी सावधगिरी बाळगावी लागते. तसेच येथील खडक-दगड गुळगुळीत आणि निसरडे असतात त्यामुळे अनेका पाय घसरून पडण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा ठिकाणी भेट दिल्यानंतर योग्य खबरदारी घ्यावी लागते. पण प्रत्यक्षात घडते मात्र नेमके उलट. अनेकदा धबधब्यावर लोक उत्साहाच्या भरात स्वत:चा अन् इतरांचा जीव धोक्यात टाकतात. असाच काहीसा प्रकार उघडकीस आला आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये काही तरुण मंडळी सातसडा धबधब्याचा आनंद घेताना दिसत आहे,दरम्यान अचानक पाणी वाढल्याने १०-१५ लोक तिथे अडकले होते. पण सुदैवाने काही अनुभवी ट्रेकर्सच्या मदतीमुळे त्यांचा जीव वाचला. तरुण मंडळींना वाचवतानाच चित्तथरारक क्षण व्हिडीओमध्ये कैद झाला आहे

व्हायरल व्हिडीओमध्ये binkamacha_mulaga_/ नावाच्या पेजवर पोस्ट केला आहे. व्हिडीओ पोस्ट करणारा तरुणाने घडलेला सर्व प्रकार व्हिडीओमध्ये सांगितला आहे. सातसडा धबधब्याला भेट देण्यासाठी गेल्यानंतर तिथे भरपूर पाऊस पडत असल्याचे त्याने सांगितले. दोन्ही बाजूने उंच कडे आणि त्यातून वाहणारे शुभ्र पाणी हे दृश्य मोहक होते. त्याचवेळी तिथे १०-१५ तरुण-तरुणींचा एक ग्रुप तिथे आला. ते लोक धबधब्यात भिजण्याचा आनंद घेण्यासाठी खुप पुढे जात होते. व्हिडिओ शुट करणाऱ्याने सांगितले की, या तरुणांना पुढे जाऊ नका सांगितले तरी त्यांनी ऐकले नाही. थोड्यावेळा पाण्यांचा रंग बदलला ज्यामुळे त्याच्या लक्षात आले की घाटमाथ्यावर खूप पाऊस झाला आहे त्यामुळे पाण्याची पातळी वाढणार आहे. १० मिनिटांत पाण्याचा जोर इतका वाढला सर्वत्र पाणीच पाणी झाली त्यामुळे सर्वजण धबधब्याच्या पाण्यातून बाहेर पडले अन् बाजूला थांबले. ते ज्या बाजूला थांबले होते तेथून बाहेर पडण्यासाठी रस्ता नव्हता त्यामुळे पाण्याचा प्रवाह ओलंडण्याशिवाय पर्याय नव्हता. बराच वेळ वाट पाहूनही जेव्हा पाण्याची पातळी कमी झाली नाही तेव्हा काही अनुभवी ट्रेकर्स मदतीसाठी पुढे आले. आपल्या जीवाची बाजी लावून त्यांनी सर्वांचा जीव वाचवला. एकामेकाचे हात घट्ट पकडून, खडकांचा आधार घेऊन ते पाण्यात उतरले आणि दुसऱ्या बाजूला अडकलेल्या तरुणांना एक एक करून बाहेर काढले.

हेही वाचा

व्हिडिओ पोस्ट करत तरुणांनी सर्वांना विनंती केली की, पावसाळ्यात पर्यटनस्थळी फिरायला गेल्यास जीवाचा विचार करा. तसेच ज्या तरुणांची त्यांनी मदत केली त्यांनी आभार देखील न मानल्याची त्याने खंत व्यक्त केली.

व्हिडीओवर कमेंट करत अनेकांनी मदतीला धावून आलेल्या ट्रेकर्सचे कौतुक केले. तर काहींनी आभार न मानल्याबद्दल तरुण मंडळींवर टिका केली.

एकाने कमेंट केली, “छान काम केले दादा, माणूसकी अजूनही जीवंत आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसऱ्याने कमेंट केली,”काही लोक उपकाराची जान ठेवत नाही. अशा वेळी निराश व्हायचे नाही. आपण केलेलं काम देव पाहतोय..तुमच्या कामाला देवाचा आशिर्वाद नक्की मिळेल.”