scorecardresearch

Heineken Beer Sneakers: शूज मध्ये बिअर, ‘हे’ नवे डिझाईन पाहिले का?

Heineken ने स्वतः या विषयी माहिती देत ट्विट केले आहे ज्यावर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट करत आपणही बिअर वर चालणाऱ्या स्नीकर्स वापरण्यास उत्सुक असल्याचे सांगितले.

Beer Shoes
Heinken Beer Sneakers (फोटो: ट्विटर/@Heineken)

फॅशनच्या जगात विचित्र प्रयोग नेहमीच होत असतात पण तरीही हा प्रत्येक प्रयोग आधीपेक्षा थक्क करून सोडणारा असतो. अशीच काहीशी भन्नाट संकल्पना बिअर ब्रँड Heineken घेऊन आलेली आहे. या ब्रँडने ‘Heinekicks’ नावाची स्नीकर्सची एक नवीन जोडी लाँच केली आहे ज्यामध्ये चक्क बिअर भरलेली आहे! हो तुम्ही बरोबर वाचलंयत, बिअर ब्रँड Heineken ने कस्टमाइझ स्नीकर कलेक्शन लॉन्च करण्यासाठी शू डिझायनर डॉमिनिक सिमब्रोनसोबत करार केला होता. Heineken ने स्वतः या विषयी माहिती देत ट्विट केले आहे ज्यावर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट करत आपणही बिअर वर चालणाऱ्या स्नीकर्स वापरण्यास उत्सुक असल्याचे सांगितले. चला तर पाहुयात या बिअर शूजचे काही खास फीचर..

या एक्सक्लुसिव्ह स्नीकर्सच्या सोलमध्ये बिअर भरलेली आहे, जी पारदर्शक सोल मधून दिसून येते. स्नीकरच्या वरच्या बाजूला तुमच्या बिअरचे कॅन उघडण्यासाठी एक इन-बिल्ट बॉटल ओपनर आहेत. डिझाइनमध्ये ट्रेडमार्क हिरवा आणि लाल रंग वापरण्यात आला आहे.

पहा बिअर शूज ची झलक

कंपनीने या शूजच्या तळव्यांमध्ये बियर इंजेक्ट करण्यासाठी विशेष सर्जिकल इंजेक्शन पद्धतीचा वापर केला असून एकूण 32 शूज तयार केले आहेत, त्यापैकी पहिले सात शूज वर्षाच्या चौथ्या तिमाहीत सिंगापूरमध्ये उपलब्ध केले जातील.

International Beer Day 2022: बिअर निर्मितीत महिलांचं वर्चस्व ते Chilled Beer चं Myth, कधीही न ऐकलेल्या गोष्टी जाणुन घ्या

ट्विटर युजर्सना बिअरने भरलेल्या स्नीकर्सची कल्पना प्रचंड आवडलेली दिसतेय. दरम्यान, अशा प्रकारच्या विक्षिप्त फॅशनची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी फॅशन हाऊस प्राडाने ट्विटरला स्विस चीजची आठवण करून देणारा छिद्र असलेला पिवळा स्वेटर लॉन्च केला होता. तूर्तास हे बिअर शूज भारतात तरी उपलब्ध नाहीत मात्र तुम्हाला हे शूज तुमच्या कलेक्शन मध्ये जोडायला आवडतील का?

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-08-2022 at 20:39 IST

संबंधित बातम्या