अंकिता देशकर

Namaj On Road Video Viral: लाईटहाऊस जर्नालिज्मला एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असताना दिसला. या व्हिडिओ मध्ये केलेल्या दाव्यानुसार, कर्नाटकच्या रस्त्यावर काँग्रेसच्या विजयानंतर एका लहान मुलाने नमाज पठण केले होते. ट्विटर यूजर, भूषण लाल भट्ट यांनी व्हायरल व्हिडीओ शेअर करून कॅप्शन लिहिले की, आज “आज सकाळी कर्नाटकमध्ये पाहिलेल्या दृश्याचा आनंद घ्या. सेक्युलर हिंदूंनी आवश्य पहा, जे मत दिले आहे त्याचा हा परिणाम आहे, एका मुस्लिम मुलासाठी भररस्त्यात ट्रॅफिक वळवले आहे. हे लोक स्वतःच्या मताने संविधान चालवतात. आता काही वर्षांनी ४०% लोकसंख्येचा भाग मुस्लिमच होतील मग बघा काय काय करतील. “

काय होत आहे व्हायरल?

तपास:

आम्ही InVid टूलमध्ये व्हिडिओ अपलोड करून आमची तपासणी सुरू केली. आम्हाला व्हिडिओचे विविध स्क्रीनग्रॅब मिळाले.

हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात असलेल्या व्हिडिओच्या तुलनेत खूपच स्पष्ट होता. आम्हाला या व्हिडिओ वर, ‘@ajom75uddin’ असे वॉटरमार्क देखील दिसले. हा एक जुना टिकटॉक व्हिडीओ होता.

गुगल सर्च केल्यावर, आम्हाला असे आढळले की कर्नाटक निवडणुका आणि निकालांच्या काही महिने आधी, ६ जानेवारी २०२३ आणि १० जानेवारी २०२३ रोजी हा व्हिडिओ टिकटॉकवर अपलोड करण्यात आला होता.

आम्ही टिकटॉक वरील हा व्हीएओ डाउनलोड केला. या व्हिडिओंमध्ये गाड्यांवरील नंबर प्लेट दुबईतील असल्याचे दिसून येत आहे. गणवेश घातलेल्या व्यक्तीच्या गणवेशावरही शर्टच्या मागील बाजूस अरबी भाषेत ‘सेक्युरिटी’ लिहिलेले आम्हाला दिसले. ‘@ajom75uddin’ या वापरकर्त्याच्या फेसबुक प्रोफाईलमध्ये दुबई हे त्याचे राहण्याचे ठिकाण आहे. हा व्हिडिओ त्याच्या फेसबुक प्रोफाईलवरही उपलब्ध आहे.

हा व्हिडीओ कर्नाटकचा नसून दुबईचा आहे हे दाखवण्यासाठी हे संकेत पुरेसे आहेत. त्यानंतर आम्ही काही कीवर्ड उर्दूमध्ये भाषांतरित केले आणि त्याबद्दल काही रिपोर्ट्स मिळतात का ते पाहण्यासाठी Google वर शोधले. आम्हाला अरबी भाषेतील काही रिपोर्ट्स सापडले.

https://www.altreeq.com/385337

आम्ही फेसबुक आणि TikTok वापरकर्ता @ajom75uddin यांच्याशी देखील संपर्क साधला आहे, ज्यांनी हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. जेव्हा आम्हाला उत्तर मिळेल तेव्हा हा फॅक्ट चेक अपडेट केला जाईल.

हे ही वाचा<< मुख्यमंत्री सिद्धरामय्या दारूच्या नशेत धुंद होऊन नाचताना Video व्हायरल; समोर आलं भलतंच सत्य

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निष्कर्ष: काँग्रेसच्या विजयानंतर एका तरुण मुलाने कर्नाटकच्या रस्त्यावर नमाज अदा केल्याचा व्हायरल दावा खोटा आणि दिशाभूल करणारा आहे. व्हायरल झालेला व्हिडिओ दुबईचा आहे, कर्नाटकचा नाही.