आजकाल लोकांना घरच्या जेवणापेक्षा बाहेरचे जेवणाची चटक लागलेली असते. स्टॉलवर, हॉटेलमध्ये जेवण करणे आजकाल सामान्य गोष्ट आहे, पण सोशल मीडियावर हॉटेलमधील स्वच्छता, काम करण्याची पद्धत पाहिल्यानंतर तुमच्या घशाखाली एक घास उतरणार नाही. असाच एका घटनेचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे जो पाहून किळस येईल.

एका हॉटेलमधील एका कर्मचाऱ्याने ‘पोळी’वर थुंकून ती ग्राहकांना खायला दिली, आणि हे सर्व एका व्हिडिओमध्ये कैद झाले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर पसरताच लोक संतप्त झाले आहेत आणि पोलिस तपास सुरू केला आहे. व्हायरल व्हिडीओमुळे हॉटेल किंवा खानावळीतील स्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

गाझियाबाद (उत्तर प्रदेश) विजय विहार कॉलनीतल्या करीम हॉटेलमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या हॉटेलमध्ये काम करणारा एक कर्मचारी ‘पोळी’वर थुंकतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

दिल्लीतील रहिवाशांकडून तक्रार दाखल

दिल्लीच्या करावल नगरमधील रहिवासी राहुल पचौरी यांनी हा व्हिडिओ पाहून संताप व्यक्त करत पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर लोन परिसरातील हॉटेलची चौकशी करण्यात आली. अंकार विहार पोलीस ठाण्यात आरोपी कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांची कारवाई व आरोपी फरार

गाझियाबाद पोलिसांनी सांगितले की, व्हिडिओच्या आधारे एफआयआर नोंदवण्यात आला असून आरोपी कर्मचारी सध्या फरार आहे. त्याला पकडण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. या घटनेमुळे खानावळी व हॉटेलमधील स्वच्छता तसेच अन्न सुरक्षा नियमांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. याप्रकरणी पुढील चौकशी सुरू असून अधिक माहितीची प्रतीक्षा आहे.