मुलांना जन्म दिल्यानंतर पालकांवर एक मोठी जबाबदारी असते ती म्हणजे त्यांना योग्य ती शिस्त, संस्कार आणि चांगली सवय लावण्याची. आजकाल अनेक लहान मुलं मोबाइलच्या आहारी गेले आहेत. मोबाइलशिवाय ते सुखाचा जेवणाचा घासही घेत नाहीत. सगळ्या गोष्टींसाठी त्यांना मोबाइल हवा असतो. पण, याच चिमुकल्यांना मोबाइलची सवय कळत नकळत पालकांकडूनच लागते, म्हणून आजच्या पिढीतील लहान मुलांना लागलेली ही सवय घालवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी पालकांनी एक आगळा वेगळा प्रयोग करून पाहिला आणि तो यशस्वीही झाला.

सध्या याचाच व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. ज्यांच्या घरी लहान मुलं आहेत त्यांनी सगळ्यांनी हा व्हिडीओ नक्कीच बघावा.

हेही वाचा… तरुणीला पाहून आजोबांचा सुटला ताबा, भरस्टेजवर डान्स सुरू असतानाच केलं किस अन्…, VIDEOमध्ये पाहा पुढे काय काय घडलं

व्हायरल व्हिडीओ

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओत आपण पाहू शकतो की, एक लहान मुलगा खूप वेळ मोबाइलवर काहीतरी बघत आहे. लहान मुलाची अति प्रमाणात मोबाइल वापरण्याची ही सवय कमी करण्यासाठी पालक एक चांगली कल्पना शोधतात. मुलाचे वडील आईला त्या मुलाच्या शेजारी बसवतात आणि तिच्या हातात एक पुस्तक देतात. तसंच मुलाचे वडीलसुद्धा एक पुस्तक आणतात आणि आईच्या शेजारी बसतात. दोघांना असं पाहून मुलगा जागेवरून लगेच उठतो आणि स्वत: एक पुस्तक घेऊन येतो आणि त्यांच्या शेजारी बसतो. पुस्तक घेताच मुलगा हातातला मोबाइल खाली ठेवून देतो. अशाप्रकारे तिघेही पुस्तक वाचू लागतात आणि पालकांचा हा प्रयोग यशस्वी होतो.

हा व्हिडीओ @marathi_life_coach या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “मुलाची मोबाइलची सवय कमी करण्यासाठी पालकांनी केलेला छान प्रयोग” असं कॅप्शन याला देण्यात आलं आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला १.८ मिलियन व्ह्युज आले आहेत.

हेही वाचा… “कोर्टात जा आणि तक्रार कर…”, नामांकित कोचिंग इन्स्टिट्यूटच्या चेअरमनने केली शिवीगाळ, मीटिंगमध्ये कर्मचाऱ्याला ओरडला अन्…, पाहा VIDEO

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावरील हा व्हिडीओ पाहून अनेकांनी पालकांचं कौतुक करत आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “अतिशय सुंदर कल्पना”, तर दुसऱ्याने “आधी कशाला सवय लावायची मग” अशी विचारणा करत कमेंट केली. तर एकाने आपला अनुभव शेअर करत कमेंट केली, तो म्हणाला, “आम्ही हे पण ट्राय केलं, पण आमचा मुलगा म्हणाला, करा तुम्हीच अभ्यास आणि तो उठून मोबाइल घेऊन गेला”, तर एक जण कमेंट करत म्हणाला, “असल्या प्रयोगाची सध्या सक्त गरज आहे.”