तुम्ही अशा अनेक हरित उपक्रमांबाबत ऐकले असेल ज्यामध्ये कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून काहीतरी उपयुक्त वस्तू तयार केल्या जाता. याबाबत माहिती देणारे अनेक अहवाल समोर येत असतात. पण प्रत्यक्षात ही सर्व प्रक्रिया कशी केली जाते याबाबत माहिती देणारे फार कमी व्हिडिओ उपलब्ध असतात. आता बघा, तुम्ही रोज कागद वापरता? कधी वर्तमानपत्र म्हणून, कधी कागदाची पिशवी म्हणून किंवा इतर गोष्टींसाठी. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, कागद कसा तयार केला जातो? कचऱ्यावर प्रक्रिया करून कागद तयार केला जातो हे कदाचित तुम्हाला माहित असेल पण ही प्रक्रिया नेमकी कशी चालते हे तुम्ही कधीही पाहिले नसेल. याबाबत आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती नसेल पण आता तुम्ही हे जाणून घेऊ शकता. उद्योगपती हर्ष गोयंका यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर नुकताच शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये कचऱ्याचा पुर्नवापर करून कागद कसा तयार जातो याची प्रक्रिया दाखवली आहे.

असा तयार केला होतो कचऱ्यापासून कागद

ट्विटरवर शेअर केलेल्या या व्हिडिओच्या सुरुवातीला कचरा एका मशीनमध्ये टाकत असल्याचे दिसत आहे, ज्यामध्ये पाणी सोडले जात आहे. हे द्रव मिश्रण एका पाईपमधून पुढे सोडले जाते. ते घट्ट झाल्यावर हे लिक्विट शीट तयार करण्यासाठी एका मोठ्या बेल्टवर पसरवू सोडले जाते. या प्रक्रियेनत्तर कागदाच्या शीट तयार होतात. ज्या उन्हामुळे वाळवल्या जातात. त्यांनतर खडबडीत कागद दुसऱ्या मशीनमध्ये टाकून दाबला जातो. त्यानंतर सुबक दिसण्यासाठी चारी बाजूने कापला जातो आणि नंतर वितरणासाठी पुढे साठवला जातो.

हेही वाचा – आजपर्यंत शेवटचे असलेले उत्तराखंडमधील माणा गाव आता झाले पहिले, कसं ते जाणून घ्या

हर्ष गोयंका यांना आवडला व्हिडिओ

” कागद कसा तयार होतो हे जाणून घेणे फार रंजक आहे. हा असा प्रयोग आहे जो जगाला एक चांगले ठिकाण बनवक आहोत.” असे कॅप्शन व्हिडिओ शेअर करताना हर्ष गोयंका यांनी लिहिले आहे. या व्हिडिओला जवळपास २०हजारपेक्षा जास्त लोकांनी पाहिले आहे तर लाखो लोकांना प्रतिक्रिया दिली आहे. कचऱ्यापासून कागद तयार करण्याची प्रक्रिया पाहून अनेक लोक आश्चर्यचकिक झाले आहे. कित्येक लोकांनी आधी व्हिडिओचे कौतूक केले आणि असा माहिती देणारा व्हिडिओ शेअर केल्याबद्दल हर्ष गोयंका याचे आभार व्यक्त केले.

हेही वाचा – तुम्ही कधी पिवळं कलिंगड खाल्लं आहे का? चवीला अत्यंत गोड असलेल्या ‘या’ फळाबाबत जाणून घ्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आम्हाला नक्की कळवा.