Viral video: सोशल मीडियावर सातत्याने विविध व्हिडीओ व्हायरल होत असल्याचे आपण पाहत असतो. हल्ली बसल्या जागी संपूर्ण जगाची माहिती आपल्याला सोशल मीडियामुळे मिळते. सध्या पावसाळा सुरू असून, या दिवसांत अनेक ठिकाणी पूर येणे, पाणी साठणे या समस्या उद्भवताना दिसतात. या संदर्भातील विविध व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना आपण पाहतो. काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसात राज्यातील बऱ्याच ठिकाणी पाणी साठले होते; तर काही ठिकाणी पाण्यामुळे लोक वाहूनदेखील गेले होते. अनेकदा माणसांप्रमाणेच प्राण्यांनादेखील पावसाळ्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. पुराच्या पाण्यात अडकलेल्या प्राण्यांना बाहेर काढण्यासाठी खूप शर्थीचे प्रयत्नही केले जातात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात एक गाय वाहून जाताना दिसत आहे. काही दिवसांपासून देशातील बऱ्याच राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साठणे, पूर येणे अशा नैसर्गिक समस्या उदभवू लागल्या आहेत. या दिवसांत सोशल मीडियावर जंगलातील प्राण्यांचे विविध व्हिडीओ वनाधिकारी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर करीत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात NDRF चे पथक पाण्यात वाहून जाणाऱ्या गाईला वाचविताना दिसत आहे. नक्की काय घडलं व्हिडीओमध्ये? या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मुसळधार पावसामुळे नदीच्या पात्राची पातळी वाढली होती आणि त्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली होती. या पाण्यात एक गाय वाहून जाताना दिसत आहे. यावेळी NDRF चे पथक त्या गाईला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करताना दिसते. त्यावेळी पाण्याचा वेगही खूप वाढला होता. या पथकाने गाईच्या शिंगाला एक दोरी बांधून तिला पाण्याबाहेर ओढून आणले. NDRF च्या या कामगिरीनंतर अनेक जण त्या पथकाचे कौतुक करीत आहेत. हा व्हिडीओ केरळमधील वायनाड येथील असल्याचे म्हटले जात आहे. हा व्हिडीओ X(ट्विटर) वरील @ANI_HindiNews या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओखाली कॅप्शनमध्ये, "केरळच्या वायनाडमधील NDRF टीमने नदीच्या पाण्यातून गाईला रेस्क्यू केलं", असे लिहिण्यात आले आहे. हा व्हिडीओला आतापर्यंत सहा हजारांहून अधिक व्ह्युज आणि अनेक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स या व्हिडीओवर कमेंट्सदेखील करीत आहेत. हेही वाचा: ‘मला लगीन करावं पाहिजे…’ लग्नासाठी मुलगी मिळेना म्हणून पठ्ठ्याने चक्क बाहुलीबरोबर केलं लग्न, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “शेवटचा पर्याय” पाहा व्हिडीओ: युजर्सच्या कमेंट्स चर्चेत एका युजरने लिहिलेय, “ही खरी माणुसकी.” दुसऱ्या युजरने लिहिलेय, “तुम्हा सर्वांना आमचा सलाम.” तिसऱ्या युजरने लिहिलेय, “खूप हृदयस्पर्शी.” आणखी एकाने लिहिलेय, "धन्यवाद, गाईचा जीव वाचवल्याबद्दल."