दोघांच्या भांडण्यात तिसरा पडला की त्याचा फायदा कमी पण नुकसान जास्त होत. अशा अनेक घटना आपण पाहिल्या किंवा ऐकल्या असतीलच. मात्र कधी कधी हे नुकसान एवढ मोठ असत की त्यामध्ये तिसऱ्याचा जीव देखील जाऊ शकतो. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे, जेव्हा पती-पत्नीच्या भांडणात शेजारी आला आणि त्याचा मृत्यू झाला. मटण बनवण्यावरून पती-पत्नीमध्ये झालेल्या भांडणामुळे हा सर्व प्रकार घडला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मटण बनवण्यावरून झाले भांडण

ही घटना मध्य प्रदेशातील भोपाळमधील आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भोपाळच्या बिलखिरियामध्ये पप्पू नावाचा व्यक्ती त्याची पत्नीसोबत भांडत होता. मटण बनवण्यावरून या दोघांमध्ये हे भांडण झाले. असे सांगितले जात आहे की, मंगळवार, १८ ऑक्टोबर रोजी पप्पूने घरी मटण बनवण्यास सुरुवात केली. यावर पत्नीला राग आला आणि मंगळवारचा दिवस असल्याने ती त्याला थांबवू लागली.

( हे ही वाचा: चक्क ‘बजरंगी’ हनुमान यांना पाठवली पाण्याची नोटीस; आता बिल नेमकं भरणार कोण? जाणून घ्या नेमकं प्रकरण)

नवऱ्याला शांत करायला शेजारी आले

मंगळवारी मटण करण्यास वारंवार थांबवूनही नवरा राजी न झाल्याने बायकोने त्याच्याशी हाणामारी केली आणि दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. यानंतर पतीने पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात केली. पत्नीचा आरडाओरडा ऐकून शेजारी राहणारा बल्लू दोघांमधील भांडण थांबवण्यासाठी पोहोचला. पण त्याला हे माहीत नव्हते की या दोघांच्या मध्ये पडणे त्याच्यासाठी इतके हानिकारक ठरेल की त्याला आपला जीव गमवावा लागेल. 

भांडण मिटवण्यासाठी खरं तर तो गेला होता मात्र नवऱ्यासोबत भांडण झाले आणि नंतर तो घरी आला. मात्र काही वेळाने महिलेचा पती काठी घेऊन शेजारील बल्लूच्या घरी गेला आणि त्याच्यावर जबरदस्त हल्ला केला. डोक्याला मार लागल्याने बल्लू जागीच जखमी झाला आणि काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. यानंतर पत्नीने पोलिसात तक्रार केल्यानंतर आरोपी नवऱ्याला पकडण्यात आले.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Husband wife fight for cooking mutton on tuesday neighbour died in the intervening gps
First published on: 20-10-2022 at 18:25 IST