Marathi vs Hindi Row in Panvel : गेल्या काही महिन्यांपासून वारंवार मराठी भाषा बोलण्यावरून वाद निर्माण होत आहे. महाराष्ट्रात राहणाऱ्या परप्रातीयांवर मराठी भाषेत बोलण्यासाठी आग्रह धरला जात आहे आणि मराठी भाषेत बोलण्यास नकार दिल्याचे काही व्हिडिओ देखील समोर आले आहे. दरम्यान पुन्हा एकदा मराठी भाषा बोलण्यावरून झालेल्या वादाचा व्हिडिओ चर्चेत आला आहे. अलीकडील पणवेलमधील घटनेमुळे पुन्हा या वादाला तोंड फुटले आहे.
सोशल मीडियावर सध्या व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओमध्ये ट्रॅव्हल व्लॉगर विजय चांदेल यांचा गणेश उत्सवाच्या तयारीदरम्यान मराठी भाषेवरून वाद झाल्याचे दिसत आहेत. क्लिपनुसार, हा वाद तेव्हा सुरू झाला जेव्हा एका महिलेने चांदेल याला मराठीत बोलण्यास सांगितले. त्यावर चांदेल म्हणाले की, “मी फक्त हिंदी बोलतो आणि तसेच बोलत राहीन.”
त्यानंतर महिलाआणि तिच्या बरोबर आणखी एक महिला गाडीतून उतरते आणि चांदेल याच्याशी वाद घालताना दिसत आहे. त्या म्हणतात की, “महाराष्ट्रात राहणाऱ्यांनी स्थानिक संस्कृतीचा आदर करावा. तसेच त्यांनी चांदेल यांनी मराठी बोलावी असा आग्रह धरला.” पण चांदेल आपल्या मतावर ठाम होता, तो म्हणाला की “मी महाराष्ट्राचा आदर करतो, पण कोणीही मला मराठी बोलण्यास भाग पाडू शकत नाही. हिंदी ही भारताची भाषा आहे आणि मी हिंदी बोलेन. मी माझ्या मरेपर्यंत मराठी बोलणार नाही.”
पुणे पल्सच्या वृत्तानुसार, चांदेलने पुढे स्पष्ट केले की, हा वाद समाजातील गणेश उत्सवाचे आयोजन कसे करावे यावरच्या वेगवेगळ्या मतांमुळे निर्माण झाला होता. काही रहिवाशांनी उत्सवाविरुद्ध मत व्यक्त केले, तर तो आणि त्याची टीम उत्सव साजरा करण्याच्या बाजूने होते. त्याने ठळकपणे सांगितले की, “हा भाषेचा वाद धर्म किंवा संस्कृतीबद्दल नाही, तर परस्पर आदर आणि वैयक्तिक पसंतीबद्दल आहे.”
घटनेनंतर चांदेलने पोलिसांकडे तक्रार नोंदवली. त्याने सांगितले की, काही लोकांनी नंतर माफी मागली तरी, त्याला सोशल मीडिया आणि मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर त्रास सुरूच आहे. “हे थांबलेले नाही, आणि मला मानसिक ताण होत आहे,” असे त्याने नमूद केले.
चांदेलने आपल्या कुटुंबाची पार्श्वभूमी देखील शेअर केली, जिथे त्यांचे कुटुंब राष्ट्रीय सेवा क्षेत्राशी दीर्घकाळ जोडलेले आहे. त्यांचे वडील संरक्षण क्षेत्रात कार्यरत होते, आणि त्याने सांगितले की,”तो आणि त्याची पत्नी भाषांबद्दल खुले विचारसरणीचे आहेत. “खरा मुद्दा,” असे त्याने सांगितले, “की कोणालाही त्याच्या इच्छेविरुद्ध एखादी भाषा बोलण्यास भाग पाडू नये.”
ही घटना महाराष्ट्रातील चालू भाषा राजकारणाच्या पार्श्वभूमीवर घडली आहे. यापूर्वी फडणवीस नेतृत्वाच्या सरकारने शाळांमध्ये त्रिभाषा सुत्र धोरण राबवण्याचा प्रयत्न केला, परंतु राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांसह नेत्यांच्या विरोधामुळे हा प्रकल्प मागे घेण्यात आला. तरीही, मराठी आणि हिंदी भाषेच्या वापरावरचा तणाव कधीकधी पुन्हा वाढत राहतो.