Viral Video: अनेकदा प्रवासादरम्यान वाहनचालकांमध्ये भांडणं होतात. गाड्यांवरील नियंत्रण सुटते व गाडीचालकांचे नुकसान होते किंवा अनेक गाड्या ओव्हरटेक करतात. अशा अनेक प्रसंगांमुळे गाड्यांचे तर नुकसान होतेच, पण या भांडणात कोणी मध्यस्ती केली तर बरं; नाही तर कधी कधी हे भांडण इतकं टोकाला जातं की, हाणामारीपर्यंतदेखील जाऊन पोहचतं. रस्त्यावरील हाणामारी, अर्थात ‘रोड रेज.’ तर आज हीच बाब लक्षात घेता बंगळुरूच्या वाहतूक पोलिस अधिकारी यांनी खास व्हिडीओ शेअर केला आहे व रोड रेज कसा टाळावा यासाठी आठ उपाय सांगितले आहेत.

व्हायरल व्हिडीओ बंगळुरूचा आहे. बंगळुरूमध्ये ट्रॅफिकदरम्यान घडणाऱ्या अनेक घटनांचे काही फोटो आणि फुटेजचा वापर करून सर्व नागरिकांसाठी हा खास व्हिडीओ तयार करण्यात आला आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला घडलेल्या घटना आणि त्यानंतर अशा प्रसंगात नागरिकांनी काय केलं पाहिजे, हे काही इमोजी किंवा विशिष्ट फोटोतून सांगण्यात आलं आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी नक्की काय टिप्स सांगितल्या आहेत, ते व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा.

हेही वाचा…ऐकावं ते नवलच! द्राक्षांचे संरक्षण करण्यासाठी अजब उपाय; चोरसुद्धा दहावेळा करेल विचार; VIDEO पाहून म्हणाल खतरनाक जुगाड

व्हिडीओ नक्की बघा…

व्हिडीओत पुढील आठ टिप्सचा समावेश आहे…

१. शांत राहा.
२. दुसऱ्या व्यक्तीशी भांडण करणे टाळा.
३. भांडण करायला जाऊन स्वतःवर संकट ओढून घेऊ नका.
४. गाडीचा नंबर कुठेतरी नोट करून ठेवा किंवा जमल्यास गाडीचा फोटो काढून घ्या.
५. बंगळुरूमधील रहिवाशांनी ११२ डायल करून आपत्कालीन हेल्पलाइन ‘Namma’ वर कॉल करा आणि त्यांना संपूर्ण घटनेची सर्व माहिती डिटेलमध्ये द्या.
६. तुमच्या भांडणामुळे ट्रॅफिक जाम होणार नाही याची काळजी घ्या.
७. जेव्हा पोलिस घटनास्थळी पोहचतील तेव्हा गोंधळ न करता संपूर्ण घटना त्यांना सविस्तर सांगा व दुसऱ्या व्यक्तीससुद्धा बोलण्याची संधी द्या.
८. कायद्याला घटनास्थळी येऊन काम हाताळू द्या. आदी काही टिप्स त्यांनी व्हिडीओद्वारे शेअर केल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @bengalurutrafficpoliceandblrcitypolice या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘रस्त्यात इतर प्रवाशाबरोबर भांडण झालयं? लक्षात ठेवा, सुरक्षा प्रथम येते! रस्त्यावरील हाणामारीच्या घटना सुरक्षितपणे कशा हाताळायच्या यावरील व्यावहारिक टिपांसाठी आमचा नवीन व्हिडीओ पाहा’; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरी या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काहींची तक्रार आहे की, कोणीही अशा वेळी उपलब्ध नसतं; तर अनेक जण वाहतूक पोलिसांनी एडिट केलेल्या या व्हिडीओची प्रशंसा करताना दिसत आहेत. वाहतुकीच्या टिप्स जरी बंगळुरू रहिवाशांसाठी असतील तरी यातील आपत्कालीन नंबर सोडता आपणसुद्धा हे उपाय फॉलो करू शकतो, ज्याने वाद टाळण्यास मदत होऊ शकेल