Viral Video :- अनेकदा घरात पाहुणे येणार असतील किंवा कोणाचा वाढदिवस असेल तर तुम्हाला एक गोष्ट आवर्जून दिसते, ती म्हणजे ‘सामोसा’. तुम्ही आतापर्यंत अनेक प्रकारचे सामोसा खाल्ले असतील. पट्टी सामोसा, जैन सामोसा, पंजाबी सामोसा; पण तुम्ही कधी ‘एक रुपयाचा सामोसा’ खाल्ला आहे का? तर आज व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत असंच काहीसं पाहायला मिळालं आहे. एक रुपयाचे छोटे सामोसा बनवणारा एक व्हिडीओ खूपच व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ (foodie Niks) या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. निहारिका आणि गणेश असं या फूड ब्लॉगर्सचं नाव आहे. हा व्हिडीओ मम्फोर्डगंज म्हणजेच भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील प्रयागराज शहराच्या परिसरातील आहे.जिथे एका व्यक्तीचा स्टॉल आहे आणि इथे हा अनोखा एक रुपयाचा सामोसा तयार केला जातो. तर व्हिडीओत दाखवण्यात आलं आहे की, सगळ्यात आधी मैद्याच्या पिठाचे छोटे गोळे करून घेतले आहेत. या मैद्याच्या पिठाच्या गोळ्यांना पुरीसारखं लाटून घेण्यात आलं आहे. पुरीसारखं लाटून घेतल्यानंतर छोट्या सुरीने त्याचे दोन भाग करून घेतले आहेत. त्यानंतर याचे छोटे छोटे कोन करून घेतले आहेत आणि त्यात बटाट्याचं सारण भरलं गेलं आहे आणि मग हे छोटे सामोसे तेलात तळून घेण्यात आले आहेत. त्यानंतर गरमागरम सामोसे हिरवी चटणीसोबत प्लास्टिकच्या वाटीतून देण्यात आले आहेत आणि असे तुम्हाला छोटे छोटे एक रुपयाचे सामोसे तयार झालेले व्हिडीओत दिसून येईल. एकदा बघाच एक रुपयाच्या चविष्ट दिसणाऱ्या सामोस्याची झलक…
हेही वाचा :-IAS अधिकारी व्हायचेय? तर ‘या’ मुलासारखे डेडिकेशन हवे; तीन तास लिफ्टमध्ये अडकला, पठ्ठ्या गृहपाठ करत बसला
व्हिडीओ नक्की बघा :-
या सामोस्याच्या व्हिडीओत ‘ताजे सामोसे खा लो’ । असं गाणं बॅग्राऊंडमध्ये वाजत आहे; तर अनेकजण एक रुपयाचे हे छोटे सामोसे बघून विविध कमेंट करताना दिसून येत आहेत. एक जण म्हणतोय की, ‘पैशांएवढेच सामोसेसुद्धा आहेत,’ तर काही जण ‘आमच्या शाळेजवळ असे सामोसे मिळायचे, बघून शाळेची आठवण आली’ असं सांगत आहेत; तर काही जण याला “सामोसा पकोडा” आणि काही जण “बेबी सामोसा’ बोलत आहेत