IND vs PAK Iit Baba Prediction: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यातील दारुण पराभवानंतर पाकिस्तानला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तानचा सलामीवीर फखर झमान चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडला आहे. न्यूझीलंडविरुद्ध क्षेत्ररक्षण करताना फखर झमानला दुखापत झाली. त्या सामन्यात त्याने कशी तरी फलंदाजी केली पण तो काही खास कामगिरी करू शकला नाही. आता हा खेळाडू संपूर्ण स्पर्धेतून बाहेर आहे. पाकिस्तानसाठी ही खूप वाईट बातमी आहे कारण या संघाला आपला पुढचा सामना भारताविरुद्ध खेळायचा आहे.

दरम्यान या सामन्याची भारतासह सर्वच क्रिकेटप्रेमींना मोठी उत्सुकता आहे. एकीकडे भारतीय क्रिकेट फॅन्स खुश असताना दुसरीकडे IIT बाबा मात्र आनंदात मिठाचा खडा टाकण्याचं काम करत आहेत. महाकुंभात स्वत: भोवती प्रसिद्धीचे वलय निर्माण केलेले लोकप्रिय आयआयटी बाबा यांनी या सामन्याविषयी मोठे भाष्य केले आहे. त्यांच्या या भविष्यवाणीने मात्र रोहित शर्मा आणि विराट कोहलीचे चाहते चांगलेच भडकले आहेत. त्यांनी भविष्यवाणी केलीये, पाकिस्तान चॅम्पियन ट्रॉफीमध्ये भारताचा पराभव करेल. आता भविष्यात काय होईल ते २३ तारखेला कळेलच. पण तो पर्यंत त्यांची ही व्हिडीओ क्लिप मात्र जोरदार व्हायरल होत आहेत. अन् हा व्हिडीओ पाहून क्रिकेट फॅन्स प्रचंड संतापले आहेत.

भारत-पाकिस्तानचा सामना होण्यापूर्वी IIT बाबा अभय सिंह यांनी कोणता संघ जिंकणार याविषयीची भविष्यवाणी केली आहे. एका युट्यूब चॅनलला त्यांनी मुलाखत दिली. त्यावेळी या सामन्यात पाकिस्तान बाजी मारेल. पाकिस्तानचा संघ जिंकेल असा दावा या बाबांनी केला. विराट कोहली आणि इतर खेळाडुंनी कितीही मेहनत घेतली. कसरत केली तरी त्यांना विजय चकवा देणार असे बाबा म्हणाले. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, ते मोठ मोठ्यानं हसतानाही दिसत आहेत. आयआयटी बाबाच्या या भविष्यवाणीने एकच खळबळ उडाली आहे. दुसरीकडे नेटकरी मात्र जोरदार टीका IIT बाबा अभय सिंह यांच्यावर करत आहेत.

पाहा व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by UNIBIT Games (@unibit.in)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ unibit.in नावाच्या इनस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरीही संतापजनक प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने “कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते हो” असा टोला बाबांना लगावला आहे. तर आणखी एकानं या बाबाच्या डोक्यावर परिणाम झाला आहे, वेड लागलंय अशा अनेक प्रतिक्रिया व्हिडीओवर येत आहेत.