लहानपणी तुमच्यापैकी अनेकांनी प्राणी, पक्ष्यांसह बाईक, कारचा आवाज काढला असेल, यात काहीजण तर सतत असे विचित्र आवाज काढून दाखवायचे. यात आजही लहान मुलांना खेळवण्यासाठी ते मज्जा मस्ती म्हणून कार बाईकचे आवाज काढून दाखवले जातात. जर तुम्हालाही असे वेगवेगळे आवाज काढून दाखवण्याची सवय असेल तर तुम्ही सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ एकदा पाहाच. कारण या व्हायरल व्हिडीओमध्ये एका पठ्ठ्याने जिभेने चक्क RX100 बाईकचा हुबेहुब आवाज काढून दाखवला आहे. या मुलाने हुबेहुब आवाज काढून दाखवण्याची कला इतकी सुंदररित्या दाखवली आहे जी पाहून युजर्सही आश्चर्यचकित झाले आहेत.

व्हिडीओच्या सुरुवातीला मुलगा आधी आपले नाव सांगतो आणि आज मी आरएक्स १०० बाईकचा आवाज काढणार आहे, असे सांगून जिभेने खरोखरचं RX100 बाईकचा हुबेहुब आवाज काढून दाखवतो. मुलाची ही कला आता युजर्सना चांगलीच आवडली आहे.

हा व्हिडिओ @royal_kastkar___ या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे, ज्याला आतापर्यंत ३ लाख २९ हजार लाईक्स मिळाल्या आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, RX100 चा ओरिजनल आवाज.. यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील सेलू बु. या गावातील गोपाल संदीप आसुटकर या चिमुकल्याने काढला RX100 बाईक चा आवाज… आवाज आवडला असेल तर त्या चिमुकल्यासाठी एक लाईक नक्की करा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बरेच लोक या मुलाचे कौतुक करत आहेत. एकाने लिहिले – हिरव्या चटणीसह ४ समोसे खाल्ल्यानंतर माझी अशी अवस्था झाली. तर काहींनी लिहिले की, तुमच्या आत एक टॅलेंट दडलेले आहे, जे लपवूनच ठेवा.