गोलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि फलंदाजीतील जबरदस्त कामगिरीच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेवर ८ विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला. ICC Champions trophy मध्ये दक्षिण आफ्रिकेला स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखवत भारताने उपांत्य फेरी गाठली. तेव्हा टीम इंडियाचे सोशल मीडियावर कौतुक होतच आहे. पण यावेळीही या मॅचमध्ये एका जोडीची जबरदस्त चर्चा पाहायला मिळाली. एव्हाना सोशल मीडियावर काल रात्रीपासून तुम्ही या जोडीला पाहिलं असेलच. ही जोडी सोशल मीडियावरची नवी मीम बनली आहे. एक मुलगी जी बहुदा साऊथ आफ्रिकन टीमची चाहती असावी तिच्या बाजूला भारतीय क्रिकेट टीमचा चाहता बसला होता. मॅडम पिझ्झा खाण्यात व्यग्र होत्या. त्याचवेळी हा चाहता तिच्याकडे असा काही बघत होता की ते पाहून ‘क्रिएटिव्ह’ डोक्याच्या माणसांना जोक्स सुचले नाही तर नवलच.

आता क्रिकेटचे सामने म्हटले की प्रेक्षकांच्या गर्दीत नेहमीच काहीतरी वेगळं पाहायला मिळतं हे कॅमेरामनला चांगलं ठाऊक असतं, ते यावेळीही पाहायला मिळालं. तेव्हा भारत पाकिस्तानच्या सामान्यातील जोडप्यानंतर आता सोशल मीडियावर ‘देसी छोरा ‘ आणि ‘ विदेशी गर्ल’ ही जोडी सुपर हिट ठरत चालली आहे. एवढंच कशाला सोशल मीडियावर या जोडीवर जोक्सही व्हायरल होत आहेत. आता तुम्हीच पाहा या दोघांबद्दल काय चर्चा होत आहे ती.

https://twitter.com/itsdhruvism/status/873872125752254464

https://twitter.com/BollywoodGandu/status/873886460637626369

https://twitter.com/Vishj05/status/873903736736763906