Virat Kohli viral video: भारतीय क्रिकेट टीमने आतापर्यंत क्रिकेट वर्ल्डकप २०२३ मध्ये चमकदार कामगिरी केली केली आहे. भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने अलीकडेच ४९ वे वनडे शतक झळकावून इतिहास रचला आहे. आता भारताचा सामना नेदरलँडशी १२ तारखेला होणार आहे. या सामन्यापूर्वीच विराट कोहलीचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये कोहली विमानातून प्रवास करताना दिसत आहे. कोहली इकॉनॉमी क्लासमधून प्रवास करताना दिसला असून चाहत्यांना कोहलीचा हा साधेपणा खूप आवडला आहे. अनेक सोशल मीडिया अकाऊंटवर त्याचे व्हिडिओ शेअर करण्यात आले आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये किंग कोहली सामान्य लोकांसोबत फ्लाइटमध्ये प्रवास करताना दिसत आहे. वास्तविक, कोहलीचा एक व्हिडिओ X (ट्विटर) वर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये तो फ्लाइटमध्ये बसलेला दिसत आहे. त्यांनी इकॉनॉमी क्लासमध्ये प्रवास केल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. विराट कोहलीला विमानात आधी बऱ्याच लोकांनी ओळखले नाही. शेजारच्या सीटवर बसलेल्या लोकांच्या हळूच लक्षात आले की, बाजुच्या सीटवर बसेलेला व्यक्ती विराट कोहली आहे आणि इतर प्रवाशांच्या लक्षात येताच अनेक प्रवाशांनी कोहलीचा क्यूट व्हिडीओ बनविला.
(हे ही वाचा : Viral Video: शुबमन गिलच्या विकेटवर सारा तेंडुलकरने केलेल्या ‘त्या’ कृतीचा व्हिडीओ तुफान व्हायरल )
भारत आणि नेदरलँड्स यांच्यात १२ नोव्हेंबरला बेंगळुरू येथे होणारा सामना हा २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य फेरीपूर्वीचा शेवटचा सामना असेल. यानंतर १५ आणि १६ नोव्हेंबरला पहिला आणि दुसरा सेमीफायनल सामना खेळवला जाईल. अंतिम सामना १९ नोव्हेंबर रोजी होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोहलीने भारताच्या पुढील सामन्यासाठी बंगळुरूला जाण्यासाठी देशांतर्गत विमानाचा वापर केला. त्याचा हाच व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
विराट कोहली फ्लाइटमध्ये प्रवाशांसोबत बसलेला दिसत असून त्याचा हा व्हिडिओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये किंग कोहली अचानक कॅज्युअल लूकमध्ये येतो आणि फ्लाइटमध्ये बसल्याचे दिसत आहे. त्याचा हा व्हिडीओ लोकांनाही खूप आवडला आहे. व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ mufaddal_vohra नावाच्या ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला ८ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओवर अनेकांच्या प्रतिक्रियाही पाहायला मिळत आहेत. कमेंट करताना एका यूजरने लिहिले आहे, ”फ्लाइटने प्रवास करणारे लोक किती भाग्यवान असतील.तर, ” कमेंट करताना आणखी एका युजरने लिहिले, “डाउन टू अर्थ क्रिकेटर” अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.