‘वंडर गर्ल जान्हवी’ या नावानं प्रत्येकाला अंचबित करून सोडलं आहे. हरयाणामधल्या छोट्याश्या गावातून आलेली जान्हवी अस्खलित इंग्रजी बोलते, तिच्या प्रत्येक शब्दांचे उच्चार हे ब्रिटिशांसारखे आहेत. त्यामुळे तिच्या बोलण्यावर प्रत्येकजण पूर्णपणे प्रभावीत होऊन जातो. काही दिवसांपूर्वी भारतभ्रमंती करायला आलेल्या परदेशी युवतींशी तिनं इंग्रजीत संवाद साधला. तिची भाषा, उच्चार ऐकून त्याही चाट पडल्या. फक्त इंग्रजीच नाही तर ८ वेगवेगळ्या भाषा १३ वर्षांची जान्हवी बोलते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राग येतोय? तोडफोड करायचीये? मग ‘ब्रेकरूम’ उत्तम पर्याय

लहान असल्यापासून तिचे बाबा तिला इंग्रजी शिकवत आहेत. इंग्रजीची तिला नंतर एवढी आवड जडली की हळहळू टीव्हीवरचे इंग्रजी कार्यक्रम, बातमीपत्र ऐकून तिनं उच्चारही सुधारले. खूप कमी वयात तिने इंग्रजी चांगल्याप्रकारे आत्मसात केली आहे. ती इंग्रजीत इतकं सुंदर बातमीपत्र वाचते की कोणालाही त्यावर विश्वास बसणार नाही. इंग्रजीबरोबरच जपानी, फ्रेंच यासारख्या भाषाही ती शिकली. विशेष म्हणजे फक्त व्हिडिओ आणि टीव्ही पाहून तिने ही भाषा आत्मसात केली आहे. आता तुम्हालाही विश्वास बसत नसेल तर सोशल मीडियावर व्हायरल होणारे जान्हवीचे हे व्हिडिओ पाहा तुम्हीही तिचे फॅन झाले नाहीत तर नवल.

Paytm चे नवे फीचर, व्हॉट्सअॅपला मोठा फटका?

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian wonder girl who speak fluent english and other 8 languages
First published on: 03-11-2017 at 15:49 IST