Viral Post : सोशल मीडियावर अनेक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनेकदा लोकं त्यांच्याबरोबर घडलेले विचित्र घटना सोशल मीडियावर शेअर करत असतात. इंडिगोच्या एका प्रवाशाने त्याच्याबरोबर घडलेली अशीच एक घटना शेअर केली आहे. त्याने एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. कारण या फोटोत तु्म्हाला सॅन्डविचमध्ये चक्क स्क्रू दिसेल. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण हे खरंय. या प्रवाशाने सांगितले की त्याला त्याच्या सॅन्डविचमध्ये स्क्रू सापडला. हा फोटो पाहून कोणालाही धक्का बसेल.
अनेकदा ऑनलाईन ऑर्डर केल्यानंतर जेवणात काही ना काही सापडल्याचे अनेक फोटो किंवा व्हिडीओ तुम्ही पाहिले असेल पण हा फोटो पाहून कोणालाही धक्का बसेल कारण हे जेवण ऑनलाईन ऑर्डर केलेले नाही तर इंडिगोच्या विमानातील आहे. इंडिगोच्या प्रवाशाने त्याच्याबरोबर घडलेला हा प्रकार सोशल मीडियावर सांगितला आहे.
त्याने लिहिलेय, “1 फेब्रुवारीला मी बंगळूरूवरुन चेन्नईला इंडिगोच्या विमानाने प्रवास करताना मला सॅन्डविचमध्ये स्क्रू दिसला. जेव्हा मी एअरलाइन्सला माफी मागण्यास सांगितले, तेव्हा त्यांचे उत्तर आले की मी हे सॅन्डविच फ्लाइटनंतर खाल्ले. मी कसा संपर्क करावा, जेणेकरुन यावर इंडिगो प्रतिक्रिया देईल.” या कॅप्शनसह हातात सॅन्डविच असलेला एक फोटो सुद्धा शेअर केला आहे. या सॅन्डविचमध्ये स्पष्टपणे स्क्रू दिसतोय. सध्या हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हायरल फोटोमुळे युजर्स इंडिगोवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे.
यापूर्वीही सोशल मीडियावर ऑनलाईन मागवलेल्या अन्नपदार्थांमध्ये कधी झुरळ तर कधी औषधाची गोळी सापडल्याचे अनेक प्रकरणे समोर आली आहे.
MacaroonIll3601 या रेडिट अकाउंटवरुन ही पोस्ट शेअर करण्यात आली असून या पोस्टवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “त्यांनी योग्य प्रतिक्रिया दिली नाही. तुम्ही तक्रार दाखल करा” तर एका युजरने लिहिलेय, “हे धक्कादायक आहे” अनेक युजर्सनी इंडिगोवर रोष व्यक्त केला आहे. काहींनी लगेच तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला आहे.