Viral Video: समाजमाध्यम वापरकर्त्यांसाठी दिल्ली मेट्रोतील व्हायरल व्हिडीओ पाहणं नवीन गोष्ट नाही. दिल्ली मेट्रोतील विविध व्हिडीओ अनेकदा समाजमाध्यमांवर व्हायरल होत असतात. कधी मेट्रोतील भांडणाचे व्हिडीओ, तर कधी कपल्सचे व्हिडीओदेखील प्रचंड व्हायरल झालेले आपण पाहतो. दरम्यान, आता दिल्ली मेट्रोतील आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आला आहे; ज्यामध्ये एक इन्फ्लूएन्सर अश्लील डान्स करताना दिसत आहे. या तरुणीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून, युजर्स तिला प्रचंड ट्रोल करताना दिसत आहेत.

ज्या प्रकारे सोशल मीडियावर कधी काय वाचायला वा पाहायला मिळेल हे सांगता येत नाही, त्याच प्रकारे आता दिल्ली मेट्रोमध्येही कधी काय पाहायला मिळेल हे सांगता येत नाही. दिल्ली मेट्रोतील अनेक नवनवीन व्हिडीओ सोशल मीडियावर सतत व्हायरल होत असतात. अलीकडे तर अनेक जण प्रसिद्ध होण्यासाठी दिल्ली मेट्रोमध्ये जाऊन रील्स बनविताना दिसतात. रील्स, डान्स, गाणी या सर्व गोष्टी पाहणं ठीक आहे; पण जेव्हा या गोष्टी अशा प्रकारे अश्लील पद्धतीनं दाखवल्या जातात तेव्हा त्या गोष्टींना वेळीच आळा घालणं गरजेचं आहे. या व्हायरल व्हिडीओतील इन्स्टाग्राम इन्फ्लूएन्सरनं डान्स करताना अश्लीलतेचा कळस गाठला आहे; जो पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ही तरुणी सुरुवातीला व्हिडीओकडे पाठ करून उभी राहते आणि त्यानंतर गाणं सुरू झाल्यावर ती पुढे जाऊन व्हिडीओकडे पाहत डान्स करायला सुरुवात करते. यावेळी ती मधे मधे अत्यंत अश्लील स्टेप करताना दिसत आहे. त्याशिवाय यावेळी तिनं क्रॉप टॉप आणि क्रॉप स्कर्ट घातला होता. या ड्रेसमध्ये ती खाली बसूनदेखील अश्लील डान्स करते. यावेळी तिच्या आसपास उभे असलेले लोक तिच्याकडे बघणंदेखील टाळतात. तिनं स्वतः तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केलेला हा व्हायरल व्हिडीओ चर्चेत आहे.

हा व्हिडीओ X (ट्विटर)वर @Deepika Narayan Bhardwaj या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करीत त्या व्यक्तीने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, दिल्ली मेट्रोतील फ्री शो पाहा. या व्हायरल व्हिडीओवर आतापर्यंत चार लाखांहून अधिक व्ह्युज आणि दोन हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत.

हेही वाचा: अरे हा किती बोलतो? माईक पुढ्यात घेऊन पोपटाने काढले प्राण्यांचे आवाज; युजर्स म्हणाले, “काही लोकांपेक्षा तो खूप स्मार्ट”

पाहा व्हिडीओ:

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या व्हिडीओवर अनेक नेटकरी कमेंट्स करताना दिसत आहेत. त्यातील एकानं लिहिलंय, “दिल्ली मेट्रोमध्ये असे व्हिडीओ काढणाऱ्यांकडून १० हजारांचा दंड घ्यायला हवा.” दुसऱ्या व्यक्तीनं लिहिलंय, “हिचा असला डान्स पाहून बाजूला उभ्या असलेल्या काकीपण घाबरल्या.” तिसऱ्या व्यक्तीन लिहिलंय, “सरकारनं यावर कठोर कारवाई करायला हवी; नाही तर देश वाया जाईल.” आणखी एका व्यक्तीनं लिहिलंय, “ही दिल्ली मेट्रो नाही; डान्स बार आहे.” तर आणखी एकानं लिहिलंय, “हिनं मेट्रोतील लोकांचे पैसे वसूल केले मनोरंजन करून.”