Apple iPhone 16 Discount Offer: बाजारात Apple iPhone स्मार्टफोनची वेगळीच क्रेझ आहे. सर्वांची इच्छा असते की आपल्याकडेही Apple iPhone असावा. मात्र, किमती जास्त असल्यामुळे अनेक जण आयफोन खरेदी करणे टाळतात. पण, आता अशा लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण तुम्हाला आयफोन कमी किमतीत खरेदी करण्याची सुवर्णसंधीच आहे. तुम्ही आता स्वस्तात आयफोन खरेदी करू शकता. पण नेमके कसे, चला तर मग जबरदस्त ऑफर्सबद्दल सविस्तर जाणून घेऊया…

आयफोन हा जगातील सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या स्मार्टफोनपैकी एक आहे. भारतीय स्मार्टफोन मार्केटमध्ये आयफोनला (iPhone) मोठी मागणीदेखील आहे. जबरदस्त लूक, स्पेसिफिकेशन्स, सिक्युरिटी फीचर्समुळे ॲपल आयफोनची किंमतदेखील तेवढीच महाग आहे, त्यामुळे पैशांअभावी अनेक जण हा महागडा स्मार्टफोन खरेदी करू शकत नाहीत. परंतु, आता तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. Apple iPhone 16 वर जबरदस्त ऑफर दिली जात आहे. या ऑफरअंतर्गत तुम्ही हा फोन कमी किमतीमध्ये खरेदी करू शकणार आहात. चला तर जाणून घेऊया कुठे मिळतेय ही भन्नाट ऑफर.

तुम्हीदेखील Apple iPhone घेण्याच्या प्रतीक्षेत आहात का? मग ही बातमी तुमच्यासाठी खूपच खास आहे. Flipkart ने नुकतेच iPhone 16 वर जबरदस्त सूट जाहीर केली असून, आता तुम्हाला हा हाय-एंड स्मार्टफोन तब्बल ९,९०१ रुपयांच्या सवलतीसह मिळू शकतो. सध्या iPhone 16 व्हेरिएंट Flipkart वर फक्त ६९,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे, ज्याची मूळ किंमत ७९,९०० होती. विशेष म्हणजे ही सवलत कोणत्याही बँक ऑफरशिवाय आणि एक्स्चेंजशिवाय सगळ्यांसाठी खुली आहे.

सवलतीबरोबर मिळतोय आणखी फायदा!

Flipkart वर तुम्ही जुना स्मार्टफोन एक्स्चेंज केल्यास ४५,१५० रुपयांपर्यंत अतिरिक्त सूट मिळू शकते. अर्थात, ही एक्स्चेंज व्हॅल्यू तुमच्या जुन्या फोनच्या स्थितीवर आणि लोकेशनवर अवलंबून असेल.

तसेच, Flipkart Axis Bank क्रेडिट कार्डने खरेदी केल्यास पाच टक्के अनलिमिटेड कॅशबॅक आणि Axis UPI द्वारे SuperMoney वापरून पेमेंट केल्यास ५०० रुपयांपर्यंत कॅशबॅकदेखील मिळणार आहे.

iPhone 16 ची खास वैशिष्ट्ये:

डिस्प्ले : ६.१ इंच Super Retina XDR OLED, HDR सपोर्टसह, २००० nits ब्राइटनेस.

प्रोसेसर : नवीनतम A१८ चिप, ६-कोर CPU, ५-कोर GPU, १६-कोर Neural Engine.

कॅमेरा : ४८MP + १२MP ड्युअल रिअर कॅमेरा, १२MP फ्रंट कॅमेरा (Face ID सपोर्ट).

बॅटरी: २२ तास व्हिडीओ प्लेबॅक, २५W फास्ट चार्जिंग, MagSafe सपोर्ट.

डिझाईन : IP६८ वॉटर/डस्ट रेसिस्टंट, ब्लॅक कलरमध्ये उपलब्ध.

कनेक्टिव्हिटी : Wi-Fi ७, Bluetooth ५.३, USB-C पोर्ट, 5G सपोर्ट.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अतिरिक्त फीचर्स : Action बटण आणि Camera कंट्रोल बटण.