IPL2022: इंडियन प्रीमियर लीग २०२२ चा सीझन २६ मार्चपासून सुरू होणार आहे आणि प्रत्येक संघाच्या फ्रँचायझींचे सोशल मीडिया हँडल स्पर्धेच्या प्रचारात व्यस्त आहेत. स्पर्धेच्या १५ व्या सीजनपूर्वी एक मेगा-लिलाव झाला, त्यानंतर सर्व संघांमध्ये मोठे बदल पाहिले गेले. १८ मार्च रोजी, राजस्थान रॉयल्सचा स्टार फलंदाज जोस बटलर, फ्रेंचायझीने कायम ठेवलेल्या तीन खेळाडूंपैकी एक, मुंबईत संघात सामील झाला. तो आरआर कॅम्पमध्ये पोहोचताच फ्रेंचाइजीने एक मजेदार व्हिडीओ शेअर केला.
युझवेंद्र चहलची विनोदी पोस्ट
या आठवड्याच्या सुरुवातीला युझवेंद्र चहलने त्याच्या टीमचे अधिकृत ट्विटर अकाउंट ‘हॅक’ केले आणि अनेक ट्विट केले. चहलने एका ट्विटमध्ये जोस बटलरसोबत फलंदाजी करण्याचा मानस व्यक्त केला होता. राजस्थान रॉयल्सच्या अधिकृत प्रोफाइलवर स्वत:चा एक फोटो पोस्ट करताना, फिरकीपटूने कॅप्शन दिले, “१००० रिट्विट्स आणि जोस बटलर अंकलसोबत तो ओपनिंग करेल.”
(हे ही वाचा: ‘पुष्पा’मधील ‘सामी सामी’ गाण्यावर चक्क हत्तीने धरला ठेका!; Video Viral)
जॉस बटलरची ‘अशी’ होती प्रतिक्रिया
बटलर कॅम्पवर पोहोचल्यावर, रॉयल्सने ट्विट वाचताच क्रिकेटपटूची प्रतिक्रिया पोस्ट केली. “जोस भाई इथे आहे आणि त्यांची प्रतिक्रिया एकदम मस्त आहे!” इथे बटलर चहलचा मेसेज पाहून प्रतिक्रिया देताना दिसतो.
(हे ही वाचा: जंगलाचा राजा सिंहाची म्हशींनी केली दयनीय अवस्था! बघा Viral Video)
(हे ही वाचा: Video: होळीच्या दिवशी कॅमेऱ्यात कैद झाले भितीदायक दृश्य! फुगा फेकताच हायवेवर उलटली रिक्षा)
राजस्थान रॉयल्सचा संघ
चहल यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा भाग होता, त्याला राजस्थानने मेगा ऑक्शनमध्ये घेतले होते. परदेशी स्टार्समध्ये, न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट, जेम्स नीशम आणि डॅरिल मिशेल हे त्रिकूट वेस्ट इंडिजचा फलंदाज शिमरॉन हेटमायरसह रॉयल्समध्ये सामील होतील. आयपीएल २०२२ च्या सीजनची सुरुवात महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज श्रेयस अय्यरच्या कोलकाता नाईट रायडर्सशी मुंबईत होणार आहे.