IPL 2024 : भारतीय क्रिकेट संघातील स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्यासाठी यंदाचा आयपीएल सीजन खूप खास आहे. तो मुंबई इंडियन्स टीमचा कर्णधार म्हणून मैदानात परत येतोय. अशा परिस्थितीत दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर असलेल्या पांड्यासाठी टी-२० विश्वचषकापूर्वी स्वत:ला सिद्ध करण्याची ही मोठी संधी आहे. पण, लीग सुरू होण्याच्या आठवडाभर आधी सोशल मीडियावर व्हायरल हार्दिक पांड्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे; जो पाहिल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांची चिंता वाढली आहे.

हार्दिक पंड्या दुखापतग्रस्त?

ट्विटरवर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे; जो मुंबई इंडियन्सच्या प्रॅक्टिस सेशनदरम्यानचा आहे. व्हिडीओमध्ये हार्दिक मुंबई इंडियन्सच्या जर्सीत एका टेबलावर झोपलेला दिसत आहे. यावेळी फिजिओ त्याच्यावर उपचार करताना दिसत आहेत. संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक लसित मलिंगाही त्याच्याजवळ उभा असलेला दिसत आहे. याच व्हिडीओमुळे हार्दिक पांड्या पुन्हा दुखापतग्रस्त झाल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. पण, लोकसत्ता डॉट कॉम या व्हिडीओची पुष्टी करीत नाही.

Wasim Akram Reacts On Hardik- Rohit Controversy
हार्दिक पंड्याच्या मुलाचा उल्लेख करत वसीम अक्रमने हार्दिक- रोहितबाबत वादावर मांडलं मत; म्हणाला, “२० वर्षांपूर्वी..”
mohammad nabi run out kagiso rabada ishan kishan wicketkeeping win mumbai indians match vs pbks ipl 2024 aggressive celebration rohit sharma haridik pandya and all mi team
VIDEO : नबी-किशनच्या ‘हुशारी’समोर आशुतोष-शशांकची मेहनत वाया; शेवटच्या ओव्हरमध्ये बाजी पालटली आणि जे घडलं…
Taiwan Earthquake
Taiwan Earthquake : भूकंपाची चाहूल लागताच कुत्र्याने घरातल्या लोकांना केले सावध, तैवान येथील भूकंपाचा व्हिडीओ व्हायरल
IPL 2024 Lucknow Mumbai Indians vs Rajasthan Royal Match Updates in Marathi
IPL 2024 MI vs RR: हार्दिक पंड्याची हुर्यो उडवणाऱ्यांना रोहित शर्माने थांबवलं? व्हीडिओ होतोय व्हायरल

दरम्यान, उमेश राणा नावाच्या एका व्हेरिफाय एक्स (पूर्वीचे ट्विटर) अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. काही लोक हा व्हिडीओ खोटा असल्याचे सांगत आहेत. हा अपप्रचार असल्याचे काही जण सांगत आहेत; पण जर हार्दिक पांड्या खरोखरच दुखापतग्रस्त असेल, तर संघासाठी मोठी समस्या असेल.

हार्दिकच्या जागी कोण होणार कर्णधार?

हार्दिक पांड्या आता संघाचा कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू आहे. अशा स्थितीत तो बाहेर पडला, तर संघाचे कर्णधारपद कोण सांभाळणार हा प्रश्न आहे. हार्दिक गेल्या दोन हंगामांत गुजरात टायटन्सचे नेतृत्व करीत होता. मुंबईने जास्तीची बोलू लावून त्याचा आपल्या संघात समावेश करून घेतला. त्यामुळे त्याच्या अनुपस्थितीचा टीमच्या रचनेवरही परिणाम होईल. रोहित शर्मा अद्याप टीम संयोजनात दिसलेला नाही. गुरुवारी रणजी करंडक विजेतेपद पटकावणाऱ्या टीमच्या खेळाडूंबरोबर एका पार्टीत तो दिसला. तसेच शुक्रवारी ॲड शूटमधील त्याचा फोटो व्हायरल झाला.