Kaka Kaku Funny Dance Video : सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ डोळ्यांतून पाणी आणणारे, काही तुम्हाला पोट धरून हसायला लावणारे असतात. तसेच काही भन्नाट डान्सचेही व्हिडीओ असतात. हे व्हिडीओ सोशल मीडियावरही तुफान व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियावर काका-काकूंच्या एका भन्नाट गाण्यावरील डान्स व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात ते अशा काही गाण्यांवर नाचतायत की, ते पाहून तुम्हाला तुमच्या मुलांचं बालपण आठवेल. तसेच त्यांचा डान्स पाहून तुम्ही पोट धरून हसाल.

सध्या अनेक लहान मुलांना यूट्यूबवर गाण्यांचे व्हिडीओ पाहायला आवडतात. याच व्हिडीओंमध्ये एक फेमस गाणं म्हणजे ‘चिव चिव चिमणे’. अनेक लहान मुलं या गाण्यावर नाचताना किंवा गाणं गुणगुणताना दिसतात. पण, आता चक्क एक काका-काकू या गाण्यावर नाचताना दिसतायत, जे पाहून उपस्थित लोकही पोट धरून हसतायत.

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एका सोसायटीमध्ये पूजा सुरू आहे. या पूजेनिमित्त डान्स कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एका काका-काकूंनी चक्क लहान मुलांच्या आवडत्या चिव चिव चिमणे या गाण्यावर अतिशय उत्साहात आणि आनंदाने डान्स केला. गाण्याला साजेशा अशा स्टेप्स त्यांनी केल्या. त्यांचा हा डान्स पाहून उपस्थित लोकही जोरजोरात हसतायत. विशेष म्हणजे या डान्समध्ये त्यांनी आपल्या मुलालाही सहभागी करून घेतले. या डान्सचा शेवट इतका भन्नाट आहे, त्यामुळे तुम्हीही हा व्हिडीओ नक्की पाहा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर marathi_vadal001 नावाच्या अकाउंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आणि लाईक केला आहे. यावर अनेकांनी आपल्या भन्नाट प्रतिक्रीया दिल्या आहेत. एका युजरने म्हटले की, मला वाटते काका-काकूंनी छान डान्स केला आहे. आयुष्य असं जगता आलं पाहिजे. तसेच दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, यांचा डान्स पाहून मलाही डान्स करायची इच्छा झाली. हा व्हिडीओ अनेकांनी रिपोस्टदेखील केला आहे.