Viral Video : आज काल व्हायरल व्हिडीओचे प्रमुख केंद्र दिल्ली मेट्रो झाली आहे असे वाटते. रोज काहींना ना काही गोष्टीवरून दिल्ली मेट्रो चर्चेत त असते. कधी कोणी येथे मारामारी करते तर कधी विचित्र कपडे परिधान करतात तर कधी कोणी अश्लील चाळे करतात. रोज धक्कादायक घटनांचे व्हिडीओसमोर येत असतात. नेटकरी या व्हिडीओला खूप ट्रोलही करतात. आता दिल्ली मेट्रोमधून नवा व्हिडीओ समोर आला आहे जो सध्या चर्चेत आहे.

श्रावण महिन्याच्या आगमनासह कावड यात्रादेखील सुरू होते. दरम्यान, दिल्ली मेट्रोमध्ये काही कावड यात्रेकरूंचा मजामस्ती करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये ते नाचताना दिसत आहे.

दिल्ली मेट्रोमध्ये कावड यात्रेकरुंचा व्हिडीओ

दिल्ली मेट्रोमधील कावड यात्रेकरूंचा डान्स व्हिडीओ व्हायरल संजीव मेहतो (@sanjeevmahto76) नावच्या यूजरने इंस्टाग्राम अंकाऊटवर शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये पाहू शकता की, कावड यात्रेकरूंचे कपडे परिधान केलेले काही तरुण भोलेनाथच्या गाण्यावर नाचताना दिसत आहे. गाण्यावर पूर्ण उत्साहाने नाचताना ते दिसत आहे. त्याशिवाय एक तरुण फ्रंट कॅमेऱ्याने व्हिडीओ शूट करतानाही दिसत आहे. व्हिडिओला दिल्ली मेट्रो एवढचं कॅप्शन दिले आहे.

हेही वाचा – लग्नासाठी देशी जुगाड! ट्रॅक्टरला बांधली दोरी, नवरदेवाला घेतले खांद्यावर अन् नदी केली पार; पाहा Viral Video

हेही वाचा – विदेशी फ्रेंड्सचा देसी अवतार! FRIENDS भारतात शूट झाली असती तर? भारतीय लग्नात कसे दिसले असते सर्व पात्र; पाहा AI फोटो

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हिडीओ व्हायरल होताच लोकांच्या मिळाल्या विविध प्रतिक्रिया

या व्हिडीओवर आता लाखो लोकांनी व्हिडीओला पसंती दर्शवत आहे आणि साधारण १.३ मिलियनपेक्षा जास्तवेळा पाहिला आहे. तसेच व्हिडीओ पाहून अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहे. काही लोकांनी कवाडी यात्रेकरूंचा हा डान्स फार आवडला तर काहींनी मेट्रोमध्ये डान्स करण्याबाबत आक्षेप दर्शवला. एका यूजरने लिहिले की, ”कित्येक दिवसांनी मेट्रोमधून चांगला व्हिडिओ मिळाला आहे.” तर दुसऱ्याने लिहिले की, ”देवाच्या नावावर हे लोक तमाशा करत आहे.”