Viral video: हत्तीला पृथ्वीवरील सर्वात मोठा प्राणी मानलं जातं. हत्तींचं वजन हजारो किलोंमध्ये असतं. हा प्राणी आपल्या पायाखाली काहीही दाबून त्याचा विनाश करू शकतात.अनेकदा हा प्राणी माणसांसोबतही राहातो, मात्र शेवटी तो आहे जंगलीच. त्यामुळे हा प्राणी जंगलात राहिलेलंच अधिक चांगलं असतं आणि त्यांनाही कदाचित जंगलातच आवडतं. हेच जर मानवी वस्तीत आले तर मात्र आपली काही खैर नाही. असाच एक धक्कादायक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. यामध्ये केरळमध्ये एका हत्तीने समुद्रात अडकलेली फॉर्च्युनर कार कशी बाहेर काढलीय याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल.

एकापेक्षा एक भयानक आणि धोकादायक प्राणी असतात. त्यांचा राग अनावर झाल्यावर तर ते खूप दहशत माजवतात आणि नुकसानही करतात. हत्ती तर सर्व प्राण्यांमध्ये जास्त बलवान आहे. त्यामुळे त्याचा राग पाहून भल्याभल्यांना घाम फुटतो. एवढ्या अवाढ्य प्राण्याला राग आल्यावर काय होईल आणि तो काय करेल याची कल्पना करुनच भीती वाटते.

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, पांढऱ्या रंगाची टोयोटा फॉर्च्युनर नदीत अडकलेली दिसते आहे, ज्याचा फक्त पुढचा भाग पाण्यात बुडालेला दिसतो.बचाव कार्य करणाऱ्या क्रेनऐवजी, एका हत्तीला हे काम देण्यात आले. एसयूव्हीच्या पुढच्या टो हुकवरून हत्तीला दोरी बांधण्यात आली, ज्याने नंतर दोरी पकडण्यासाठी आणि अविश्वसनीय शक्तीने ओढण्यासाठी त्याच्या सोंडेचा वापर केला. यानंतर हत्तीनं संपूर्ण ताकद लावून ही कार बाहेर काढलीय. अखेर हत्तीमुळे फॉर्च्युनर कर वाचली आहे. लोकांनी प्राण्याच्या ताकदीचे कौतुक केले आहे. काही मिनिटांतच, २,१०५ किलो ते २,१३५ किलो वजनाचे हे वाहन पाण्याच्या बाहेर काढण्यात आले. टोयोटा फॉर्च्युनरचे एकूण वजन २,७३५ किलोपर्यंत जाऊ शकते, ज्यामुळे हत्तीचा पराक्रम अधिक प्रभावी बनतो.

पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ Saidokya90 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या शेअर केलेल्या या व्हिडिओला इंस्टाग्रामवर २० लाखांहून अधिक व्ह्यूज आणि १ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. यावर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रया दिल्या आहेत. एकानं म्हंटलंय, “बापरे किती ताकद आहे” तर आणखी एकानं, जबरदस्त अशी प्रतिक्रया दिल्या आहेत.