Viral Video Man Providing Affordable Meals At CPR : कोल्हापूर म्हंटल की, डोळ्यासमोर येत प्रसिद्ध कोल्हापुरी चप्पल, तांबडा-पांढरा रस्सा, मिसळ आणि येथील अनेक पर्यटन स्थळे. पण, पर्यटन स्थळांव्यतिरिक्त व्यतिरिक्त येथील माणसही सोन्यासारखी असतात. म्हणूनच कोल्हापूरच्या लोकांचा अनेक जणांना अभिमान वाटतो आणि इथे राहणारी लोकसुद्धा गर्वाने आम्ही कोल्हापूरकर आहोत असे गर्वाने सांगताना दिसतात.

अनेकदा कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील रुग्णांसाठी प्रमुख आधारवड असलेल्या छत्रपती प्रमिला राजे म्हणजे सीपीआर रुग्णालयाचा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. यामध्ये अमित नावाचा एक कार्यकर्ता फक्त साठ रुपयाला जेवण देतो. त्याची जेवण द्यायची पद्धत सुद्धा खुप आपुलकीची आहे. पैसे कमी जास्त असले तरी त्याने कोणालाही कधीच जेवण कमी दिले नाही. हे रुग्नालयात उपस्थित एका व्यक्तीने पहिले आणि अनुभवले व व्हिडीओ शूट करून पोस्ट केला.

रुग्णालयात आजारी व्यक्तीला जाताना आपण टेन्शनमध्ये असतो. त्यामुळे गरजेच्या वस्तू, खाण्यासाठी डब्बा, पिण्यासाठी पाणी बरोबर घेऊन जायच्या हे आपल्याला लक्षात सुद्धा येत नाही. आपण रुग्णालयात अचानक रुग्ण घेऊन जातो. आपण घाई घाईत तिथे पोहचतो. पण, आपल्याकडे काही वस्तू नसतात. पण, त्याच वस्तू इथे ५० टक्के सवलतीच्या दरामध्ये मिळतात. यांच्याकडे तेल, पाण्याची बॉटल पेशंटला लागणारी डायपर, वाईफ्स, ज्यूस, सर्व प्रकारचे साबण, कोलगेट, दात घासायचा ब्रश इत्यादी साहित्य इथे तुम्हाला फक्त ५० टक्के सवलतीच्या दरामध्ये मिळतात.

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. “कोल्हापूरचा अभिमान, यासाठी वाटतो भावा…” ; अशी कॅप्शन व्हिडीओला दिली आहे. नेटकरी सुद्धा व्हिडीओ पाहून ” अमितचा नंबर आहे, कोणाला गरज लागली तर फोन करा तुम्हाला शोधत येणारा.माणुस आहे हा”, “हो सर आम्ही सीपीआर मध्ये होतो त्यावेळी हेच आम्हाला पीएन जेवन द्यायचा’ खुप प्रामाणिक मूलगा अहे” ; आदी अनेक कमेंट्स नेटकरी करताना दिसय आहेत.