Kushmanda Devi Navratri 2024: हिंदू धर्मात आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत शारदीय नवरात्र साजरी केली जाते. भारतात शारदीय नवरात्रीला महत्त्वाचे स्थान प्राप्त आहे. यंदा ३ ऑक्टोबरपासून नवरात्रीला सुरुवात झाली असून आज नवरात्रीचा चौथा दिवस आहे. नवरात्रीचे नऊ दिवस देवीच्या विविध नऊ रूपांची पूजा-आराधना केली जाते. नवरात्रीचा चौथा दिवस दुर्गा मातेच्या कुष्मांडा या चौथ्या रूपाला समर्पित आहे आणि आजच्या दिवसाचा रंग केशरी आहे. गूगल ट्रेंडवरही आज देवी कुष्मांडा हा कीवर्ड खूप चर्चेत आला आहे.

शास्त्रानुसार, देवीच्या विविध नऊ दिवसांची उपासना करण्याचे वेगवेगळे महत्त्व आहे. देवी कुष्मांडाची उपासना करणाऱ्या भक्तांना देवी चैतन्य आणि शक्ती प्राप्त होते असे म्हटले जाते. तसेच आजचा केशरी रंग हा जीवन, उत्साह आणि सकारात्मकतेचे प्रतिनिधित्व करणारा रंग आहे.

देवी कुष्मांडाचे दिव्य रूप

हिंदू पौराणिक कथेनुसार, या विश्वाची निर्मिती होण्यापूर्वी सर्व काही अंधारात होते. देवी कुष्मांडाने तिच्या दिव्य हास्याने विश्वाची निर्मिती केली, ज्यामुळे ब्रह्मांडात चैतन्य पसरले. देवी कुष्मांडाला आदि स्वरूपा आणि आदिशक्तिदेखील म्हटलं जातं. देवी कुष्मांडा सिंहावर स्वार असते. कुष्मांडाचे आठ हस्त असून तिच्या सात हातांमध्ये धनुष्य, बाण, कमळ, कलश, चक्र, गदा, कमंडलू आहे, तर तिच्या आठव्या हातामध्ये सर्व सिद्धी आणि निधी आहेत. तिच्या हातामध्ये जो अमृतकलश आहे, तो तिच्या भक्तांच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी असल्याचे म्हटले जाते.

देवी कुष्मांडाची पौराणिक कथा

पौराणिक कथेनुसार, राक्षस जतुकासूर आणि त्याच्या सैन्याचा पराभव केल्यावर देवी चंद्रघंटा संपूर्ण ब्रह्मांड अंधारात घेऊन गेली. या ब्रह्मांडाची पुन्हा निर्मिती करण्यासाठी आणि अंधकार संपवून सृष्टीत चैतन्य निर्माण करण्यासाठी देवी पार्वतीने कुष्मांडा हे रूप धारण केले. वाईटावर विजय मिळवण्यासाठी देवी चंद्रघंटाच्या उग्र आणि निर्भय रूपाला मूर्त रूप दिल्यानंतर, देवी पार्वतीने विश्वाचा समतोल, जीवन आणि प्रकाश पुनर्संचयित करण्यासाठी देवी कुष्मांडा रूपात अवतार घेतला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
(सौजन्य – google trend)

वर दिलेल्या गूगल ट्रेंड्सच्या चार्टमध्ये तुम्ही पाहू शकता, चौदा तासांमध्ये दोन हजारांपेक्षा अधिक युजर्सनी देवी कुष्मांडा हा कीवर्ड सर्च केला आहे.