scorecardresearch

Video : म्हशींच्या गोठ्यात विसावला बिबट्या; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

गोरेगाव येथील आरेच्या जंगलातील एका गोठ्यात बिबट्या दिसून आला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी थक्क झाले आहेत.

Leopard rests in buffalo herd
गोठ्यातील एका कोपऱ्यात हा बिबट्या बराच वेळ बसून होता.

सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातले अनेक व्हिडीओ भयानक असतात, काही व्हिडीओ खूपच मजेशीर असतात, तर काही व्हिडीओ आपल्याला आश्चर्यचकित करतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये गोरेगाव येथील आरेच्या जंगलातील एका गोठ्यात बिबट्या दिसून आला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी थक्क झाले आहेत.

या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, म्हशीच्या गोठ्यात एक बिबट्या दिसत आहे. एका कठड्यावर तो बसलेला आहे. यावेळी म्हशी मात्र अतिशय निर्धास्त आहेत. त्यांना बिबट्या तिथे असण्याची अजिबात भीती वाटत नाही. कठड्यावर बसलेला बिबट्या आळस देत आहे. गोठ्यातील एका कोपऱ्यात हा बिबट्या बराच वेळ बसून होता. यानंतर तो काहीवेळ गोठ्यात देखील फिरत होता.

२५ वर्षाच्या मुलीने ६० वर्षाच्या वृद्धासोबत केलं लग्न; लग्नानंतर तरूणीचे दिलेली रिअ‍ॅक्शन व्हायरल

आरेच्या जंगलात बिबट्या दिसण्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल हातात. त्याप्रमाणेच हाही व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरीही थक्क झाले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Leopard rests in buffalo herd the video went viral on social media pvp