प्रत्येकाच्या आयुष्यात सुखं -दुखं येत असतात. चांगल्या -वाईट गोष्टी घडतं असतात, जगण्यासाठी प्रत्येकजण संघर्ष करतो, स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येकजण धरडपतो. प्रेम मिळवण्यासाठी धरपडत असतो. दुख पचवण्यासाठी लढत असतो. आपण सतत कशाच्यातरी मागे धावत असतो. पण या सर्व गोष्टींमागे धावता धावता पण आयुष्य जगायचं विसरून जातो. तुम्ही म्हणाल हे बोलणे सोपं आहे पण करणे तितकेच अवघड आहे. खरं आहे पण प्रयत्न करून पाहायला हरकत काय आहे. आता तुम्ही म्हणाल, आयुष्य जगायचं म्हणजे नक्की काय करायचं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल? म्हणतात ना ”आयुष्य सुंदर आहे फक्त ते जगता आलं पाहिजे”, याची प्रचिती देणारा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला समजेल की आयुष्य आनंदाना कसं जगावं.

हेही वाचा – चला हवा येऊ द्या! पीएमपीएल बससमोर कारने घेतली माघार; व्हायरल होतोय व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओमध्ये एका टेम्पो रस्त्यावरून जात आहे. टेम्पाच्या केबिनमध्ये ड्रायव्हरशेजारी एक कुत्रा निवांतपणे बसलेला दिसत आहे. गाडीच्या बाहेर डोके काढून तो प्रवासाचा आनंद घेताना दिसत आहे. कुत्र्याचा हा गोंडस व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. लोकांना हा व्हिडीओ प्रचंड आवडला आहे. व्हिडीओ पाहून तुम्ही तुमच्या चिंता विसरून जाल. हा व्हिडीओ तुम्हाला नक्की प्रेरणा देईल. आनंद-दुख येते-जाते पण तरीही आयुष्यातील प्रत्येक क्षण भरभरून जगता आला पाहिजे जसा व्हिडीओमध्ये हा कुत्रा जगत आहे.

हेही वाचा – Spy माकडाची बाहुली झाडावरून पडली खाली; ते मेल्याचं समजून माकडांनी व्यक्त केला शोक, हृदयस्पर्शी व्हिडीओ पाहाच

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हिडीओ लाखो लोकांनी पाहिला असून अनेकजण कमेंट करत आहेत. एकाने कमेंटमध्ये लिहिले की, ”त्याला (कुत्र्याला) हे आवडत आहे.” दुसऱ्याने कुत्र्याची काळजी व्यक्त करत म्हटले की, ”प्रेम चांगल आहे पण हे थोडं धोकायदायक आहे” तर आणखी एक जण म्हणाला की, टेम्पोला दरवाजा असता तर बरे झाले असते.