पुणे तिथे काय उणे! असे म्हणतात ते उगाच नाही. ज्या गोष्टी तुम्ही पुण्यात अनुभवता त्या कुठेही अनुभवू शकत नाही. पुणेकरांच्या स्वभावाचे आणि व्यक्तिमत्त्वाचे अनेक किस्से आपल्याला ऐकायला मिळतात. असे म्हणतात की, पुणेकरांबरोबर कोणीही वाद घालू शकत नाही. पुणेकरांबरोबर वाद घालण्यापेक्षा अनेक लोक आधीच हार स्वीकारतात. असे अनेक किस्से तुम्ही ऐकले असतील. पुणेकरांसारखीच पुण्याची वाहतूक व्यवस्थादेखील आहे याची प्रचिती देणारा एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.

पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड म्हणजेच पीएमपीएमल ही पुण्याची सर्वाजनिक वाहतूक व्यवस्था आहे. जसे पुणेकरांचे हटके किस्से प्रसिद्ध आहे प्रमाणे पीएमपीएमल बस प्रवासाचे हटके किस्से देखील प्रसिद्ध आहेत.

Pune, man theft, theft in Neighbor house,
पुणे : आईच्या शस्त्रक्रियेसाठी शेजाऱ्याचे घर फोडले
wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
Nashik heat, Temperature Hits New High, 40 Degrees Celsius, nobody on manmad street market, summer, summer news, summer in nashik, heatwave in nashik, heat wave in manmad, manmad news, nashik news,
नाशिक : उंचावणाऱ्या तापमानाने आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ, मनमाडमधील रस्त्यांवर असलेला शुकशुकाट
stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री

पीएमपीएमएल बसमध्ये रोज काही नाही घडतच असते. कधी कंडक्टर सुट्या पैशांसाठी प्रवाशांना टोमणे मारतात, तर गर्दीमध्ये प्रवास करून वैतागलेले पुणेकर पीएमपीएमल प्रशासनाला नाव ठेवतात. कधी आरक्षित जागेसाठी महिलांचे वाद होत असतात तर कधी पीएमपीएल बस चालकाच्या बेशिस्त पद्धतीने वाहन चालवण्याबाबत टीका होत असते. नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पीएपीएल बस चालकाच्या बेशिस्त पद्धतीमुळे रोज नाहक त्रास सहन करावा लागतोच पण रस्त्यावरून जाणाऱ्या इतर वाहनांना देखील त्यांचा त्रास होतो. असाच काहीसा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

हेही वाचा – जबरदस्त! लेझीम पथकाचे नृत्य पाहून तुम्हीही उत्साहाने नाचू लागाल! नेटकरी म्हणतायत,”व्हिडीओ एकदा पाहाल तर…”

हेही वाचा – जुगाड करून बोटीमध्ये बसवला पॅडलवर चालणारे वल्हव; व्हायरल व्हिडीओ पाहून व्हाल थक्क

व्हिडीओ मध्ये तुम्ही पाहू शकता की,”एक पीएमपी बस चालक छोट्या रस्त्यावरून बस नेत आहे. रस्त्याच्या दुतर्फा दुचाकी पार्क केल्ल्या आहेत. हा रस्ता इतका छोटा आहे की एका वेळी एकच मोठे वाहन जाऊ किंवा येऊ शकते. बस चालकासमोर एक कार असल्याचे व्हिडीओमध्ये दिसते. रस्ता निमुळता असल्यामुळे कार चालक स्वत:ची कार मागे घेताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये पाहू शकता की, कसे एक कार उलट्या दिशेने मागे जात आहे. पीएमपीएमल बस दुसऱ्या दिशेने येत आहे. ” व्हिडीओ पाहून असे वाटते की, पुण्याच्या बससमोर कारचालकाने देखील हात ठेकवले आणि चूपचाप गाडी मागे घेतली.

हेही वाचा – बाप लेकीचं प्रेम! फ्लाइटसाठी तयार होणाऱ्या एअरहोस्टेस लेकीला घास भरवतायेत वडील; तुफान व्हायरल होतोय ह्रदयस्पर्शी व्हिडीओ

व्हिडीओवर अनेकांनी कमेट केल्या आहेत. एकाने म्हटले की, ”हे दर्शविते की कार चालक किती आदराने कार उलटी मागे घेतच आहे आणि आपल्या सर्वांना PMPML ड्रायव्हर्सबद्दल माहिती आहे’ तर दुसरा व्यक्ती म्हणतो की, हे पुण्यात समान्य गोष्ट आहे. तिसरा म्हणतो. ”पीएमपीएलची भिती”