सोशल मीडियावर रोज कोणता ना कोणता हृदयस्पर्शी व्हिडीओ व्हायरल होत असतो. गेल्या काही दिवसांपासून असाच एक व्हिडीओ व्हायरल होत असून गायक गुरु रंधावा याने सुद्धा आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही नक्कीच भावूक व्हाल. आतापर्यंत अनेकजणांनी हा व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की एक लहान मुलगा एका ठेल्यावर काम करत आहे. तो रस्त्याशेजारी एका टेबलावर उभा राहून तव्यावर काहीतरी बनवत आहे. हा मुलगा खूपच लहान आहे. ज्या वयात या मुलाने खेळणं आणि अभ्यास करणं अपेक्षित आहे त्या वयात हा मुलगा आपल्या कुटुंबाचं पोट भरण्यासाठी रस्त्याशेजारील ठेल्यावर काम करत आहे.

मॅगी आणि पाणीपुरीचं विचित्र कॉम्बिनेशन सोशल मीडियावर होतंय व्हायरल; नेटकऱ्यांनी व्यक्त केली नाराजी

तुटलेले पाय घेऊन रस्त्यावर फिरत होता इसम; बघणाऱ्या लोकांची भीतीमुळे झाली वाईट हालत

गुरु रंधावा याने हा व्हिडीओ आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला असून त्याने या व्हिडीओसोबत एक कॅप्शन लिहले आहे. यात त्याने लिहलंय, ‘देव सर्व मुलांचे रक्षण करो. कुटुंबाचे पोट भरण्यासाठी हे मूल कष्ट करत आहे.’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला असून या व्हिडीओला आतापर्यंत २७ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच अनेक लोकांनी या व्हिडीओवर कमेंट्स केल्या आहेत.