Little Boy Behind The Wheels Of Mahindra Thar In Bengaluru : सोशल मीडियावर रोज अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यात काही व्हिडीओ रस्त्यावरील बेशिस्त वाहतुकीसंदर्भातही असतात. वाहतूक पोलिस विभागाकडून रस्त्याने वाहन चालवण्यासंदर्भात काही नियम आणि अटी लागू केल्या गेल्या आहेत. मात्र, अनेक नागरिक सर्व नियम धाब्यावर बसवून बेशिस्तीने वाहन चालवताना दिसतात. त्याचा विनाकारण होणारा त्रास अनेकदा शिस्तीने वाहन चालवणाऱ्या इतर चालकांनाही सहन करावा लागतो. तसेच सध्या सोशल मीडियावर एका लहान मुलाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होताना पाहायला मिळत आहे; जो पाहून लोक चांगलेच संतापले आहेत.

या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने लहान मुलाच्या हातात कारचे स्टेअरिंग दिले आहे आणि तो आरामात बाजूला बसून ते हॅण्डल करतोय. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होताच लोकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. आता पोलिसांनी या प्रकरणी कारचालकांवर कारवाई केली आहे. हे प्रकरण बेंगळुरूमधील असल्याचे सांगितले जात आहे.

जगातील सर्वात वाईट पदार्थांच्या यादीत भारतातील ‘या’ भाजीचा समावेश; तुम्हाला आवडते का ही भाजी?

व्हायरल व्हिडीओमध्ये पाहू शकता की, एक व्यक्ती बेंगळुरूच्या रस्त्यावर आपल्या लहान मुलाच्या हातात महिंद्रा थारचं स्टेअरिंग देत गाडी चालवताना दिसत आहे. अवघ्या सहा-सात वर्षांचा तो मुलगा अतिशय वर्दळीच्या रस्त्यावर गाडी चालवत होता; ज्यामुळे अपघात होऊन हानी होण्याची शक्यताही होती. लहान मुलांना गाड्यांचे आकर्षण जरी असले तरी प्रत्यक्षात मात्र १८ वर्षांखालील मुलांना सरकारी नियमानुसार गाडी चालवायला बंदी आहे. तरीही या मुलाच्या हातात पालकांनी गाडीचे स्टेअरिंग दिले असून, मुलगा भरट्रॅफिकमध्ये सुसाट गाडी चालवताना आपल्याला व्हिडीओत पाहायला मिळत आहे.

ही घटना एका व्यक्तीने आपल्या मोबाइल कॅमेऱ्यात कैद करून ती सोशल मीडियावर शेअर केली; जी पाहताच पोलीसही चक्रावले आणि वाहनमालकावर तत्काळ कारवाई केली. हा व्हिडीओ @sagayrajp या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे; ज्यावर युजर्स विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एका युजरने लिहिले, “श्रीमंत लोक काहीही करू शकतात.” तर दुसऱ्या युजरने लिहिले, “या प्रकरणी गंभीर कलमे लावून कारवाई करणे गरजेचे आहे आणि पालकांनी चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.” या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, पोलिसांनी थारच्या मालकावर कारवाई केली आहे.