Bones Found In Veg Biryani Viral News: इंदौरच्या विजट नगर परिसरात असलेल्या एका रेस्टॉरंटमध्ये व्हेज बिर्याणीत हाडे सापडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका ग्राहकाने व्हेज बिर्याणीची ऑर्डर दिली होती. बिर्याणी खात असताना त्यात हाडे असल्याचं या ग्राहकाच्या निदर्शनास आलं. त्यानंतर त्याने तातडीनं मध्य प्रदेश पोलिसांना संपर्क साधून या धक्कादायक प्रकाराबद्दल माहिती दिली. आकाश दुबे असं तक्रार दाखल करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. आकाशच्या तक्रारीनुसार, मध्य प्रदेश पोलिसांना रेस्टॉरंट मालकावर गुन्हा दाखल केला.

एएनआयच्या माहितीनुसार, व्हेज बिर्याणीची ऑर्डर देण्यात आली होती. मात्र या बिर्याणीत हाडे असल्याचा दावा आकाशने केला आहे. बिर्याणीत हाडे सापडल्यानंतर आकाशने रेस्टॉरंटचा व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांकडे याबाबत तक्रार केली. त्यानंतर व्यवस्थापक आणि इतर कर्मचाऱ्यांनी आकाशची माफी मागितली. हा गंभीर प्रकार आकाशने पोलिसांना कळवल्यानंतर रेस्टॉरंट मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

नक्की वाचा – भन्नाट! ‘बेशरम रंग’ गाण्यात तरुणीने भरला नवा रंग, बोल्ड डान्सचा video तुफान व्हायरल, नेटकरी म्हणाले, ” हिच्यापुढं दीपिका फेल”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“विजय नगर पोलिसांनी आयपीसीच्या कलम २९८ अंतर्गत रेस्टॉरंटचा व्यवस्थापक स्वप्नील गुजराती याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरु आहे. तपासाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल. ” अशी माहिती पोलीस उपायुक्त संपत उपाध्यय यांनी दिली आहे. दरम्यान, व्हेज बिर्याणीत हाडे सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडालीय. हा धक्कादायक प्रकार आकाशने उघडकीस आणल्याने रेस्टॉरंटच्या मालकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचं समजते.