Viral Post : डिजिटल युगात अनेक गोष्टी ऑनलाईन खरेदी केल्या जातात. ऑनलाईन खरेदीचे क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. ऑनलाईन जेवण असो की महागड्या वस्तू मोबाईलच्या एका क्लिकमुळे घरपोच मिळते ऑनलाईन खरेदी करण्याचे जसे फायदे आहे तसे बरेच तोटे सुद्धा आहे.सध्या अशीच एक पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. एका व्यक्तीने २३ फेब्रुवारी रोजी एक्सवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्याने अॅमेझॉनवरून फेक आयफोन १५ (iPhone 15) मिळाल्याचे सांगितले. त्याने पोस्टमध्ये या फेक आयफोनचा फोटो सुद्धा शेअर केला आहे. सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय ठरली आहे. अनेक जण अॅमेझॉनच्या सेवेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे.
व्हायरल पोस्ट
एक्स यूजर @GabbbarSingh ने आयफोन १५ चा एक फोटो शेअर केला. या फोनवर “unfortunately photos has stopped” लिहिलेले दिसत आहे. या पोस्टवर संताप व्यक्त करत या यूजरने लिहिलेय, “वाह! अॅमेझॉनने फेक आयफोन डिलीव्हर केला आहे. विक्रेता Appario आहे. अॅमेझॉन चॉइसबरोबर टॅग केले आहे. बॉक्समध्ये कोणताही केबल नाही फक्त बॉक्स आहे. कुणाला यापूर्वी असा अनुभव आला आहे?”
अॅमेझॉननी दिले उत्तर
Amazon Help या एक्स अकाउंटवरून यूजर @GabbbarSingh च्या पोस्टवर अॅमेझॉनने प्रतिक्रिया दिली आहे. @GabbbarSingh तुम्हाला पॅकेजमध्ये चुकीचे प्रोडक्ट मिळाले आहे त्यामुळे आम्ही माफी मागतो. कृपया तुमची माहिती येथे भरा: https://amzn.to/3wsqbs2 ६ ते १२ तासांमध्ये आम्ही याबाबत माहिती घेऊन तुम्हाला संपर्क साधू.”
या पोस्टवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिली आहेत. काही युजर्सनी संताप व्यक्त केला आहे. एका युजरने त्याला आलेला अनुभव सांगिकला आहे. युजरने लिहिलेय, “१५ दिवसांपूर्वी माझ्याबरोबर असेच घडले होते. आयफोन १५ ऐवजी मला जुना वापरलेला अॅन्ड्रॉइड फोन डिलीव्हर करण्यात आला होता. माझे पैसे गेले. अॅमेझॉने मदत करण्यास नकार दिला. कृपया अॅमेझॉनवर महागड्या वस्तू खरेदी करणे टाळा. तर एका युजरने लिहिलेय, “प्रत्येकवेळी प्रत्येक गोष्ट अॅमेझॉनवर बनावटी आहे. डायपर, हेअर ऑइल, टिव्ही, मायक्रोव्हेव खरेदी करणे टाळा. दुकानात जाऊन खरेदी करा” आणखी एका युजरने लिहिलेय, “अॅमेझॉन आता निरुपयोगी होत आहे. मला अनेकदा समस्यांचा सामना करावा लागला.