प्रत्येकाला रेस्टॉरंटमधील जेवण खायला आवडते. पण, रेस्टॉरंटमधील महागडे जेवण रोज परवडणारे नसते. त्यामुळे रेस्टॉरंटमध्ये खाण्याचे मन असले तरी काहीवेळा घरच्या जेवणावर समाधान मानावे लागते. अशा परिस्थितीत एका व्यक्तीने अतिशय क्रिएटिव्ह उपाय शोधून काढला आहे. त्या व्यक्तीने जुगाड करून १०० दिवस रेस्टॉरंटमधून मोफत जेवणाचा आनंद घेतला. पण हे कसे शक्य झाले याविषयी संबंधित तरुणाने सोशल मीडियावर एक खुलासा केला; जो ऐकून लोक थक्क झाले.

न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, या मुलाचे नाव गेज असून, तो ऑल थिंग्ज द पॉडकास्ट नावाचे चॅनेल चालवतो. एके दिवशी त्याने ChatGPT ला विचारले की, तो मोफत जेवण कसे ऑर्डर करू शकतो? यावेळी चॅट जीपीटीने उत्तरात सांगितले की, एकदा जेवण ऑर्डर करा आणि नंतर खोट्या तक्रारी करीत रहा. कंपनी नेहमीच तुम्हाला फुकट जेवण पाठवेल. कारण- ते त्यांच्या प्रॉडक्टची बाजारपेठेतील प्रतिमा सांभाळण्याचा प्रयत्न करतात. या तरुणानेही तसेच केले. तो टिल्स किंवा टेबलांवरून पावत्या चोरू लागला. मॅकडोनाल्डच्या फीडबॅक सर्व्हेमध्ये या पावतीवर सापडलेला कोड त्याने प्रत्येक वेळी जेवणाविषयी तक्रार करताना वापरला. त्याने सांगितले की, त्याला दिलेले जेवण खूप खराब होते.

जुगाडपासून बनविले चक्क विमान; हवेत उडवून दाखवताच लोक म्हणाले, “पोरांनो कमाल…” पाहा VIDEO

मोफत व्हाउचरसाठी करीत होता ‘हे’ काम

तरुणाने सांगितले की, जर तुम्ही फीडबॅक सर्व्हेमध्ये रेस्टॉरंटमधील जेवणाबाबत तुम्ही अत्यंत असमाधानी आहात, असा रिव्ह्यू दिलात, तर रेस्टॉरंट तुमच्याशी नक्कीच संपर्क साधेल. मीही तेच केले. आपण इच्छित असल्यास, आपण मेलदेखील करू शकता. अंदाजे १२ तासांत एक कार्यकारी अधिकारी तुम्हाला एक, दोन, तीन किंवा चार फूड व्हाउचर पूर्णपणे मोफत असलेला ईमेल पाठवेल. नऊ महिन्यांत कंपनीची अशा प्रकारे फसवणूक करून, मी १०० फूड व्हाउचर मिळवली आहेत. याबाबत तरुणाने पुढे सांगितले की, जेवण फुकट मिळते तेव्हा ते आणखीनच स्वादिष्ट लागते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कल्पना ऐकून लोक झाले थक्क

तरुणाने त्याची कल्पना सोशल मीडियावर शेअर करताच ती व्हायरल झाली. त्या तरुणाची ही पद्धत समजल्यावर लोक पूर्णपणे थक्क झाले. त्यावर अनेकांनी त्या मुलाला खडसावले; तर काही लोकांना त्या तरुणाची कल्पना आवडली.