Linkedin Viral Post: तुम्ही सोशल मीडियावर अनेक अशा पोस्ट पहिल्या असतील ज्याद्वारे मदतीचे आवाहन केले जाते. त्यावेळी मदत करणारे लोक देखील खूप असतात. अनेक अनोळखी लोकांकडून मदतीचा हात पुढे येतो. मात्र गरजेवेळी केलेल्या मदतीची प्रामाणिकपणे केलेली परतफेड तुम्ही पाहिली आहे का? सध्या सोशल मीडियावर अशीच एक पोस्ट व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका व्यक्तीला दीड वर्षांपूर्वी केलेल्या मदतीची परतफेड मिळाली आहे, तेही रक्कम कमी असताना.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कमल सिंह नावाच्या युजरने लिंक्डइनवर एक पोस्ट शेअर केली होती ज्यामध्ये त्याने पैसे परत मिळण्यामागची गोष्ट शेअर केली होती. पोस्ट शेअर करताना, कमल सिंह म्हणाले की त्यांना PhonePe वर एका अनोळखी व्यक्तीकडून २०१ रुपये मिळाले. त्याला पहिल्यांदा काही कळाले नाही. जेव्हा त्याने त्या व्यक्तीशी बोलायला सुरुवात केली तेव्हा त्याला असे आढळले की त्याने सुमारे दीड वर्षांपूर्वी सोशल मीडिया साइटवर फंड रेजिंगचे आवाहन वाचून एक छोटीशी मदत म्हणून त्या व्यक्तीला पैसे पाठवले होते. पोस्टमध्ये त्याने त्या व्यक्तीसोबत केलेल्या संभाषणाचा स्क्रीनशॉटही शेअर केला आहे.

( हे ही वाचा: Viral Video: लग्नमंडपात नवरीचा धिंगाणा; होणाऱ्या नवऱ्यासमोरच एक्स बॉयफ़्रेंडसाठी असं काही केलं की…)

स्क्रीनशॉट इंटरनेटवर व्हायरल झाला

( हे ही वाचा: हत्तीला मारण्यासाठी वाघ धावला अन्… गजराजने अवघ्या ३० सेकंदात डावच पालटला; पाहा Viral Video)

स्क्रीनशॉटमध्ये तुम्ही पाहू शकता की ७ जुलै २०२१ रोजी कमलने २०१ रुपयांची मदत केली होती. पैसे पाठवताना त्याने मेसेजमध्ये लिहिले की, ‘ही माझ्याकडून छोटीशी मदत आहे, तुझ्या आईची काळजी घे.’ सुमारे दीड वर्षानंतर अचानक कमल सिंग यांच्या मोबाईलवर २०१ रुपये परत आले. यावर कमल सिंह यांनी ‘तुझी आई कशी आहे’ असा प्रश्न विचारला. त्या माणसाने उत्तर दिले, ‘ती ठीक आहे आणि माझा व्यवसायही चांगला चालला आहे.’ ते पुढे म्हणाले की, गरजेच्या वेळी लोकांकडून घेतलेले सर्व पैसे ते परत करत आहेत. यावर कमल सिंह म्हणाले, ‘पैशाच्या लालसेने भरलेल्या या जगात त्याचा प्रामाणिकपणा पाहून मला खूप आश्चर्य वाटले.’

लोकांनी अशा प्रतिक्रिया दिल्या

ही पोस्ट शेअर केल्यापासून याला एक लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत, तसंच शेकडो लोकांनी याला शेअर देखील केले आहे. तसंच अनेकांनी यावर आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. एका युजरने म्हटलंय की, ही एक प्रेरणादायी कथा होती.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man had given 201 rupees after one and half years person return everyone money gps
First published on: 13-10-2022 at 19:14 IST