सध्या सेल्फीची क्रेझ खूप जास्त आहे. अनेकजण सेल्फी घेण्याच्या हव्यासापोटी आपला जीव धोक्यात घालण्यापासून मागे हटत नाहीतव. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्याने लोक हैराण झाले आहेत. वास्तविक, व्हायरल क्लिपमध्ये एक माणूस चित्तासोबत सेल्फी घेताना दिसत आहे. असे घडले की जंगल सफारी दरम्यान , एक चित्ता अचानक उडी मारतो आणि गाडीवर चढतो. हे पाहून घाबरण्याऐवजी आत बसलेला एक व्यक्ती त्याच्यासोबत सेल्फी काढू लागला. चित्ता व्यक्तीच्या तोंडाजवळ अगदी जवळ बसल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. आता हा व्हिडिओ पाहून नेटिझन्स विचारत आहेत की सेल्फी घेणारा माणूस जिवंत आहे की नाही?

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये सफारी कारभोवती एक चित्ता फिरत असल्याचे तुम्ही पाहू शकता. त्यानंतर अचानक उडी मारून त्यावर चढतो. यानंतर, तो सनरूफवर उडी मारतो आणि आरामात बसतो. चित्ता जवळून पाहिल्यानंतर आत बसलेले पर्यटक घाबरून गेल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. मात्र त्यानंतर चालक मोबाईल काढून चित्तासोबत सेल्फी घेण्यास सुरुवात करतो. हे पाहून पर्यटकही थक्क झाले आहेत. काहींच्या मनात असाही विचार येत असेल की हा काय मूर्खपणा करतोय. क्षणभर ड्रायव्हरही घाबरतो. पण त्यानंतर काय होते, ते तुम्हीच व्हिडिओत पाहा.

( हे ही वाचा: “तुझ्या बुलेटची फटफट बंद कर…”; म्हशीने दाखवला असा इंगा की तरुणाला घडली जन्माची अद्दल)

येथे पाहा, चित्तासोबतचा सेल्फी घेतानाचा व्हिडिओ

( हे ही वाचा: आधी डेंग्यांनी पकडलं नंतर…; चक्क खेकड्याने केली कासवाची भयानक शिकार, पाहा Viral Video)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडिओ IFS अधिकारी क्लेमेंट बेन यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. यासोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे, आफ्रिकन सेल्फी, चीता स्टाइल. व्हिडिओला आतापर्यंत ७३ हजारांहून अधिक व्ह्यूज आले आहेत, तर सुमारे ३ हजार लोकांनी त्याला लाईक केले आहे. त्याचवेळी, व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक सतत मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी याला सेल्फी ऑफ डिकेड म्हटले आहे.