Prayagraj Train Marathi-Amrathi Dispute Video : महाकुंभ मेळ्यासाठी देशभरातून कोट्यवधी भाविक उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये जाण्यासाठी रेल्वेस्थानकांवर गर्दी करत आहेत. त्यासाठी रेल्वेनेही विशेष ट्रेन सोडल्या आहेत. मुंबईसह विविध राज्यांतील रेल्वेस्थानकांवरून या रेल्वेगाड्या सोडण्यात आल्या आहेत. रेल्वेगाड्यांची संख्या वाढवली तरी गर्दी मात्र कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. प्रयागराजला जाणाऱ्या सर्वच ट्रेन प्रवाशांनी गच्च भरून जातायत. सीटवर बसण्यासाठी जागा मिळणं तर सोडाच; पण दोन पायांवर उभं राहण्यासाठीही जागा शिल्लक नाही. प्रयागराजमध्ये जाणाऱ्या अशाच एका ट्रेनमध्ये मराठी भाषेवरून वाद उफाळून आला आहे, ज्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

गेल्या काही दिवसांत मुंबईत मराठी आणि अमराठी वादाचा मुद्दा चांगलाच गाजतोय. वारंवार परप्रांतीय अमराठी भाषकांकडून मराठी माणसांना अपमानास्पद वागणूक दिली जातेय. पण हे प्रकरण शांत होत नाही, तोवर आता प्रयागराज ट्रेनमधील मराठी अमराठी वादाची घटना समोर आली आहे. या व्हिडीओत मराठी आणि हिंदी भाषकांमध्ये सीटवरून वाद झाल्याचे ऐकू येत आहे.

सीटवर बसण्यावरुन सुरु झाला मराठी- अमराठी वाद

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक मराठी माणूस एका हिंदी भाषक व्यक्तीला म्हणतोय की, ह्याला काय वाटतं तिथून मराठी माणूस आला आहे, तर त्याला दाबून टाकू. त्यावर मागून एक मराठी माणूस उत्तर देतो की, तुम्हाला काय वाटतं आम्ही कॉम्बो आहोत. यावर हिंदी भाषक भांडण करून वर उत्तर देतो की, आता जरा शांत बस ना, मराठीत कशाला ओरडतोयस… त्यावर एक मराठी तरुण त्याला म्हणतो की, तुझ्या मागे बसून बोलणाऱ्याची जरा बोलण्याची भाषा बघ ना, मी मराठीत ओरडणार तू काय करणार, यावर तो हिंदी भाषिकही, तू काय करणार मला, यावर तो मराठी तरुण संतापून म्हणतो की, जातोय ना जा गप्प, हल्ला करण्याची भाषा वापरू नकोस. यानंतर तिसरा एक मराठी व्यक्ती सांगतो की, आमची जागा आहे. यावर पुन्हा तो तरुण म्हणतो की, जागा आमची आहे, आम्ही सामान ठेवू, नाही तर खाली ठेवू, असे तो म्हणतोय. यावेळी मागून एक व्यक्ती हिंदी भाषकाला सांगतेय की, तुमच्या मुलाला समजावा जरा. अशा प्रकारे सीटवर सामान ठेवण्यावरून हा वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे. पण, वारंवार अशा प्रकारे मराठी माणसांना दाबण्याचा प्रयत्न परप्रांतीय करीत असल्याचे दिसतेय.

View this post on Instagram

A post shared by Deepak Martande (@deepak_martande)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

deepak_martande नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरू हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर अनेकांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे.