Marathi Language Controversy Mumbai Local Train Video : राज्यात सध्या मराठी भाषेच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलेच पेटलेय. आता या वादाचे पडसाद मुंबई लोकल ट्रेनमध्येही पाहायला मिळतायत. महिला कोचमधील महिलांमध्ये मराठी भाषेवरून जोरदार राडा झाला, ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत काही महिला असे म्हणताना ऐकू येतयं की, जर तुम्हाला महाराष्ट्रात राहायचे असेल तर तुम्हाला मराठी बोलावे लागेल. ही घटना मध्य रेल्वेच्या लोकलमध्ये घडल्याचे सांगितले जात आहे.

असे सांगितले जाते की, महिलांमध्ये जागेवरून वाद झाला. काही वेळाने हा वाद इतका वाढला की, तो भाषेच्या मुद्द्यावर पोहोचला. या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये पाहू शकता की, मुंबई लोकलच्या महिलांच्या कोचमध्ये काही महिलांमध्ये शाब्दिक बाचाबाची सुरू आहे. यात एक महिला दुसऱ्या महिला प्रवाशाला हा आमचा महाराष्ट्र आहे, मराठी येत नसेल तर बाहेर निघ, असं म्हणताना ऐकू येत आहे.

दोन महिलांमध्ये सीटवर बसण्यावरून हा वाद झाला. यावेळी थेट तो भाषेच्या मुद्द्यावर जाऊन पोहोचला, यामुळे डब्ब्यात काहीवेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. महिलांमध्ये दोन गट तयार झाले, जे एकमेकांशी भाषेच्या मुद्द्यावरून जोरजोरात भांडू लागले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मराठी भाषेच्या मुद्द्यावरून राडा झाल्याची अनेक प्रकरणं समोर येत आहेत.