एलॉन मस्क यांनी ट्विटर खरेदी केल्यापासून कंपनीमध्ये अनेक बदल केले आहेत. यातील काही बदल लोकांना आवडले तर काही बदलांवर अनेकांनी नाराजी दर्शवली. परंतु मस्क हे आपल्या निर्णयावर ठाम राहत त्यांनी स्वत:ला योग्य वाटतील ते सर्व बदल ट्विटरमध्ये केले. या बदलांमध्ये सर्वाधिक चर्चेत आलेला बदल म्हणजे ब्ल्यू टिक काढून टाकण्याचा. या निर्णयाला अनेकांनी विरोध करुनही मस्क ब्ल्यू टिक काढून टाकण्यावर ठाम राहिले.

ट्विटरच्या नवीन नियमानुसार अनेक दिग्गज लोकांच्या अकाऊंटच्या ब्लू टिक्स काढून टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे जगभरातील अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी ब्लू टिक्स गमावल्या आहेत. यामध्ये भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा, दिग्गज फलंदाज विराट कोहली आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांचाही समावेश आहे. याच मुद्यावरुन सध्या नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस पाडला आहे. खासकरुन विराट कोहलीने आपला ब्लू टिक गमावल्याच्या मुद्यावरुन अनेक मीम्स व्हायरल होत आहेत. जे पाहून अनेकांना आपलं हसू आवरणं कठीण होत आहे. तर नेटकऱ्यांनी केलेली मीम्स नेमकी कशी आहेत ते पाहूया.

हेही पाहा-एकनाथ शिंदे, अजित पवारांसह अनेक दिग्गजांच्या ट्विटर अकाउंटची ब्लू टिक हटवली; अभिनेते, खेळाडूंचाही समावेश!

अरुन सिंग नावाच्या व्यक्तीने विराटसारख्या दिसणाऱ्या एका व्यक्तीचा फोटो शेअर करत त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, “विराट कोहली ब्ल्यू टिकशिवाय” हे मिम पाहून अनेकांनी मजेशीर कमेंट केल्या आहेत. तर शशांक नावाच्या एका महाराष्ट्रातील वापरकर्त्याने तर विराट कोहलीची ब्लू टिक काढल्यानंतर तो चक्क एका गावात निवडणुकीच्या प्रचारासाठीचे प्रमुख आकर्षण असल्याचा फोटो पोस्ट केला आहे.

हेही वाचा- Apple स्टोअरमध्ये चोरी! ४ कोटींचे आयफोन गायब; मनी हाईस्ट स्टाईलच्या चोरांचा फंडा जाणून व्हाल थक्क

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तर आणखी एका नेटकऱ्याने विराटचे अनेक फोटो एकत्र करत विराटचे खरे ट्विटर अकाऊंट आणि खोटे हे कसं शोधायचं या विचारात आपण गोंधळल्याचं म्हटलं आहे. सध्या अशी अनेक मिम्स सोशल मीडियावर व्हायरल होत असून ती पाहिल्यानंतर तुमचंही मनोरंजन होईल यात शंका नाही.