मायकल जॉर्डनचे प्रसिद्ध ‘फ्लू गेम’चे स्नीकर्स गोल्डन ऑक्शनमध्ये जवळपास ११ कोटी रुपयांनी विकण्यात आले. हा लिलाव १९९७ एनबीए फायनल मॅचला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित करण्यात आला होता. १९९७ एनबीए फायनल ही शिकागो बुल्स आणि यूटा जॅज यांच्याबरोबर खेळण्यात आली. पाचव्या राऊंडपर्यंत हे दोन्ही संघ दोन दोनच्या बरोबरीने होते. हे शूज इतके महाग असण्याचे कारण म्हणजे मायकलने या हाय व्होल्टेज सामन्यात एक अविस्मरणीय शॉट मारला होता; ज्यामुळे मॅच जिंकली होती.
जॉर्डनने ३८ पॉइंट्समधील १५ पॉइंट चौथ्या क्वार्टरमध्ये मिळवले होते. या सामन्यादरम्यान त्याच्यामध्ये फ्लूसारखे लक्षण दिसत होते; ज्यामुळे त्याला नीट उभे राहायलाही कठीण होते. अशा परिस्थितीतही तो खूप चांगला खेळला होता.
आजही फॅन्सच्या लक्षात आहे की, मायकल जॉर्डनने कशा प्रकारे यूटा जॅजविरुद्ध स्वत:ला ३८ अंकापर्यंत नेले आणि सामना जिंकला. त्यामुळे जॉर्डनच्या करिअरमधील ही सर्वश्रेष्ठ खेळी म्हटली जाते.
हेही वाचा :वारकरी म्हणे- डॉग म्हणजे डॉक्टर, हा भोळेपणा पाहून डॉक्टरांना आलं हसू; पाहा वारीतील मजेशीर व्हिडीओ
जॉर्डनने आपले हस्ताक्षरीत केलेले हे शूज यूटा जॅजच्या बॉल बॉय प्रेस्टन ट्रूमॅनला भेटस्वरूप दिले होते. १५ वर्षांनंतर ट्रूमॅनने आपली संपत्ती विक्रीसाठी ग्रे फ्लानेल लिलावात जमा केली होती.
लाल रंगाचे हे शूज दिसायला खूप आकर्षक आहेत. सध्या या शूजचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या शूजवर युजर्सनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही युजर्स तर या शूजची किंमत वाचून अवाक् झाले आहेत.